टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढत असलेला विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज मंगळवारी महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. Strict curfew in Pandharpur city and its environs
पंढरपूर शहरात 6 ते 13 ऑगस्ट या दरम्यान लॉक डाऊन करण्यात येत असल्याची घोषणा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली आहे.दूध ,मेडिकल वगळता कडक संचारबंदी असणार आहे.
पंढरपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी लॉक डाऊन लागू केला जावा असा प्रस्ताव प्रशासनाकडून पाठवण्यात आला होता. त्यावर आज सोलापूर येथे पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत घोषणा केली आहे.
याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील , सोलापूर चे आयुक्त पी . शिवशंकर , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले की , पंढरपूर आणी परिसरा मध्ये येत्या 6 तारखेच्या मध्यरात्री 12 पासून म्हणजे 7 तारखेच्या पहाटेपासून 13 च्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊन लागू होणार आहे.प्रदक्षिणा मार्ग आणि जास्त प्रादुर्भाव असलेल्या परिसरातील लोकांची आरोग्य तपासणी करन्यात येणार आहे.
परिस्थिती पाहून डाऊनमध्ये तीन दिवसापर्यंत वाढही होऊ शकते.केवळ दूध , हॉस्पिटल , मेडिकल स्टोअर्स सुरू राहणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज