mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

वटपौर्णिमेलाच सुहासिनीचा कुंकवाचा धनी हिरावला! ८ दिवसांत बेकायदा दारू विक्री बंद करा; अन्यथा महिला दारू धंद्यावर जाऊन बाटल्या फोडणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 3, 2026
in क्राईम, मंगळवेढा
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

टीम ​मंगळवेढा टाईम्स । बोराळे (प्रतिनिधी)

श्री बसवेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बोराळे नगरीत सध्या अवैध दारू धंद्यांचा सुळसुळाट वाढला असून, अनेक निष्पाप युवक व्यसनाच्या आहारी गेले आहेत. या अवैध दारू विक्रीमुळे अनेक सुखी संसार उघड्यावर आले आहेत.

या पार्श्वभूमीवर, बोराळे गाव संपूर्णपणे दारूमुक्त करण्याचा एकमुखी निर्णय घेत पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री कवचाळे यांच्या नेतृत्वाखाली गावातील शेकडो महिलांनी रस्त्यावर उतरून भव्य रॅली काढली आणि प्रशासनाला थेट इशारा दिला.

​वटपौर्णिमेच्या दिवशीच कोसळले दुःखाचे डोंगर!
​वटसावित्री पूर्णिमेला वडाच्या झाडाला फेऱ्या मारून ‘सात जन्मी हाच पती मिळो’ अशी प्रार्थना सौभाग्यवती महिला करतात.

मात्र, दुर्दैवाने याच वटपौर्णिमेच्या दिवशी गावातील एका तरुण मुलीचा पती दारूच्या व्यसनापायी मयत झाल्याची धक्कादायक घटना घडली.

या घटनेने संतप्त झालेल्या जयश्री कवचाळे यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने गावातून दारू हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. त्याला गावातील संपूर्ण महिला भगिनींनी १०० टक्के प्रतिसाद देत रॅलीत सहभाग नोंदवला.

​एकाच कुटुंबातील तीन महिला झाल्या विधवा

“आमच्या एकाच कुटुंबातील तीन तरुण मुले दारू पिऊ लागल्याने, दारूच्या व्यसनाने त्यांचे बळी घेतले. आज एकाच घरातील तीन महिला विधवा होऊन त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे,” अशी अत्यंत हृदयद्रावक प्रतिक्रिया रॅलीत सहभागी झालेल्या एका पीडित महिलेने व्यक्त केली.

​…तर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांची असेल

​या रॅली दरम्यान महिलांच्या हातामध्ये दारू बंदीचे फलक लक्ष वेधून घेत होते. यावेळी महिलांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला:
​शाळेजवळच दारूची विक्री: शाळेच्या अगदी जवळच दारू विकली जात असल्याने लहान मुलांनी काय आदर्श घ्यावा? असा संतप्त प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

​हप्तेखोरीचा आरोप

पोलीस ‘मंथली’ (हप्ता) घेत असल्यामुळेच हे दारू धंदे फोफावले असून अनेकांचे संसार रस्त्यावर आल्याचा थेट आरोपही यावेळी करण्यात आला.

​८ दिवसांचा ‘अल्टिमेटम’

​पीडित महिलांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि बोराळे गावातून अवैध धंदे कायमचे हद्दपार करण्यासाठी गावचे सरपंच व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

​येत्या आठ दिवसांत बोराळे गावातून अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद झाली पाहिजे. तसे न झाल्यास महिलांचा मोर्चा थेट दारू धंद्यांवर धडकेल आणि तिथेच बाटल्या फोडल्या जातील,” असा खणखणीत इशारा जयश्री कवचाळे यांनी दिला आहे.

तसेच, पोलिसांनी वेळीच कठोर कारवाई न केल्यास या मोर्चाचे पडसाद संपूर्ण मंगळवेढा तालुकाभर उमटतील आणि यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

​याप्रसंगी बोलताना कवचाळे यांनी, “यापुढील काळात गावात कोणीही अवैध धंद्यांना थारा देऊ नका, युवकांनी व्यसनापासून दूर राहावे आणि आपले कुटुंब सक्षम करण्यासाठी महिलांच्या या लढ्याला सर्वांनी साथ द्यावी,” असे आवाहन केले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शिक्षिकेने ६ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली; पुढच्याच क्षणी चिमुकल्याचा जागीच तडफडून मृत्यू

August 22, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

गावाचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढा, पण पोलिसांचा 35 ग्रामस्थांवर गुन्हे; मंगळवेढ्यात बायपास आंदोलनावरून ग्रामस्थ आक्रमक; हक्क मागणे हा गुन्हा आहे का?

August 21, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

​वर्षानुवर्षांचा वनवास संपणार कधी? थकीत रकमांचा निर्णय होईना; दामाजी कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आक्रमक; आज कारखान्याला ठोकणार कुलूप?

August 19, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
Next Post
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सभापती दीपाली ताड यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! मंगळवेढा तालुक्यातील ७ जिल्हा परिषद शाळांना मिळाले नवीन शिक्षक; ​पालक वर्गातून व्यक्त होतोय आनंद

ताज्या बातम्या

कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध; महाराष्ट्र सरकार लावणार शिस्त; दिवसाला ५ तासांची मर्यादा; ‘इतक्या’ वर्षांखालील मुलांना प्रवेश मनाई, शुल्कवाढीलाही लगाम

August 24, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतीत जाऊनही ग्रामसेवक भेटत नाही? राज्य सरकारने गुपचूप घेतला ‘हा’ मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 23, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा