मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मिलिटरीचा पोषाख घालून आलेल्या आठ ते दहा दरोडेखोरांनी विजयपूर जिल्ह्यातील (कर्नाटक) येथील स्टेट बँकेवर सशस्त्र धाडसी दरोडा टाकत 8 कोटी रुपये 50 किलो सोने लुटले.
काल मंगळवारी सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान हा प्रकार घडला. घटनेनंतर दरोडेखोर मंगळवेढा तालुक्यातील हुलजंतीत आले अन् तेथे जीप सोडून पळून गेल्याचे सांगण्यात आले.
मंगळवारी दिवसभर कामकाजानंतर सायंकाळी बँक बंद झाली. अधिकारी, कर्मचारी घरी गेल्यावर सायंकाळच्या सुमारास दरोडेखोरांनी हा डाव साधला. बँकेतील रक्कम लुटल्यावर आलेल्या जीपमधून दरोडेखोर मंगळवेढ्याच्या दिशेने पळून गेले.
मंगळवेढा तालुक्यातील हुलजंतीमध्ये जीप सोडून दरोडेखोरांनी वेगळ्या वाटेने पळून गेल्याचा अंदाज आहे. घटनेचे वृत्त समजताच विजयपूरचे पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी हवालदार गजानन मुडशी आदी घटनास्थळी रवाना झाले. घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली.
हुलजंती येथे अपघातग्रस्त कारमध्ये १०० रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले
हुलजंती येथे एका कार चालकाने कारने (केए २४ डीएच २४५६) गावातील तरुणास धडक दिली. गावातील लोकांनी कारचा पाठलाग केल्यानंतर एका वस्तीत गाडी घुसवण्याचा प्रयत्न केला. रस्ता नसल्याने इको गाडी पाठीमागे घेऊन पिस्टन दाखवून, दोन बॅगा घेऊन जंगलात तो इसम पळून गेल्याचे नागरिक सांगत आहेत.
मात्र घटनास्थळी गाडीमध्ये केवळ शंभर रुपयाच्या नोटांचा एक बंडल व सोने तारणसाठी शील बंद केलेली बँकेची २० ते २५ पाकिटे व काही फाटक्या नोटा या गाडीमध्ये आढळून आल्या. दरोड्यातील एवढी मोठी रक्कम गेली कुठे हा प्रश्न उपस्थित होत आहे.
कर्नाटकातील स्टेट बँकेवर दरोडा ८ कोटी रु., ५० किलो सोने लंपास; कारमधून आलेल्या दरोडेखोरांनी बँक कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून लुटले
महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या विजयपूर जिल्ह्यातील चडचण (कर्नाटक) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये अज्ञात बंदूकधारी ५ दरोडेखोरांनी बँक कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून जवळपास ८ कोटींची रोकड व ५० किलो सोने लुटून नेल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
दरोडेखोर महाराष्ट्राच्या दिशेने कारमधून आल्याचा पोलिसांना संशय आल्याने कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना सतर्क केले आहे. विजयपूरचे पोलिस अधीक्षक लक्ष्मण निम्बर्गी, इंडी विभागाचे पोलिस उपाधीक्षक आर जगदीश, चडचणचे सीपीआय सुरेश बेंडेगुंबाळ बँकेत तळ ठोकून आहेत. रात्री उशिरापर्यंत दरोड्याचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती.
रकमेचा दुजोरा पोलिसांनी दिलेला नाही. चडचण शहरातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी हे दैनंदिन कामकाज उरकल्यानंतर सायंकाळी नेहमीप्रमाणे बँकेचे उर्वरित कामकाज करीत असताना अचानक कारमधून येऊन बंदूकधारी ५ दरोडेखोर बँकेत घुसले.
त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून हातपाय बांधून सर्व कर्मचाऱ्यांना एका खोलीत बंद केले. त्यांच्याकडून तिजोरीच्या चाव्या घेऊन तिजोरी उघडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली.(स्रोत:दिव्य मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज