mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आठ महिने फरार असलेला आरोपी पकडण्यात मंगळवेढा पोलीसांना यश; जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी; काय आहे प्रकरण?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 18, 2025
in क्राईम, मंगळवेढा
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील फिल्टर पाणी तयार करण्याच्या कंपनीचे गेट तोडून कंपनीमधील मशिनरी घेवून जात असताना यातील आरोपी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख (रा.पाटकूल ता.मोहोळ)

व अन्य आरोपींनी एकास मारहाण करुन एका महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी गेली आठ महिने फरार असलेल्या आरोपीस पकडण्यात मंगळवेढा पोलीसांना यश आले आहे.

दरम्यान पोलीसांनी आरोपीस अटक करुन न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी बाबूराव बर्गे (वय ३३ रा.लक्ष्मी दहिवडी) यांचा पाणी फिल्टरचा व्यवसाय आहे. दि.५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता पॅकबंद बाटली बॉक्स विक्रीसाठी वाहनात भरुन फिर्यादी हे सांगोला येथे आले होते.

दुपारी २ वाजता फिर्यादीच्या मोबाईल नंबरवर फिर्यादीची पत्नी अश्विनी हिचा कॉल आला. एका चार चाकी वाहनामध्ये काही लोक तसेच नणंद राधीका तिचा नवरा किरण जाधव येवून कंपनीच्या गेटचे कुलूप तोडून कंपनीतील मशिनरी घेवून जात आहेत.

तुम्ही लवकर या असे कळविल्यावर फिर्यादी हे मित्राची मोटर सायकल घेवून दहिवडी येथे आले. त्यावेळी आरोपी प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख, किरण उध्दव जाधव, राधीका किरण जाधव, दत्ता पवार, जकाप्पा उर्फ भैय्या शेजाळ असे घटनास्थळी असल्याचे फिर्यादीस दिसले.

यावेळी आरोपीने तू मला ओळखत नाही का? सोलापूर जिल्ह्यातील लोक घाबरतात, मी बऱ्याचजणांना कामाला लावले आहे, तु माझे ऐकत नाही का? ही कंपनी राधीका जाधवला का देत नाही? असे म्हणून लोखंडी पाईपने फिर्यादीस पाठीवर पायावर मारुन गंभीर जखमी केले.

यावेळी फिर्यादीस वाचविण्यासाठी त्याची पत्नी मध्ये आल्यावर आरोपी राधीका जाधव हिने तिचे केस ओढून मारहाण केली व इतर आरोपींनी तिच्या अंगास हात लावून तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते.

दरम्यान या घटनेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर आरोपी हे फरार झाले होते. मागील दोन दिवसापुर्वी आरोपी मोहोळ शहरात आल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळताच कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, डी. वाय.एस.पी.डॉ. बसवराज शिवपुजे, पो.नि.दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली

तपासिक अंमलदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लातुरकर, पोलीस अंमलदार महिपती कांबळे, पोलीस अंमलदार प्रेम दिवसे आदींनी मोहोळ शहरात एका ठिकाणी रात्रीच्या वेळी छापा टाकून फरार आरोपी प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख याला ताब्यात घेतले.

तब्बल आठ महिने आरोपी घटनेनंतर फरार झाला होता. आरोपीला अटक करुन मंगळवेढा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दि.१८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अटकप्रभाकर देशमुख

संबंधित बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल सावंत जिल्हा परिषद ‘या’ गटातून निवडणूक रिंगणात उतरणार; विरोधी गटातील नेत्यांकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता

January 20, 2026
कौतुकास्पद! जयराम आलदर यांना सोलापूर मुख्याध्यापक संघाने दिली मोठी जबाबदारी; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

कौतुकास्पद! जयराम आलदर यांना सोलापूर मुख्याध्यापक संघाने दिली मोठी जबाबदारी; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

January 20, 2026
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

नेता असावा तर असा..! कार्यकर्त्यांच्या घामाला संधी मिळावी म्हणून स्वेच्छेने एक पाऊल मागे घेत मंगळवेढा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून घेतली माघार

January 20, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

उपरा नको.. आमचाच उमेदवार हवा! मंगळवेढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नेत्यांची झाली चांगलीच गोची…

January 19, 2026
कार्यकर्त्यांनो कामाला लागा! सिध्देश्वर आवताडे विधानसभा निवडणूकीच्या मैदानात उतरणार; बबनराव आवताडे गटाने आवळली वज्रमुठ

आनंदाची बातमी! शेतकऱ्यांसाठी मंगळवेढ्यात मका हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ; एसएमएस प्राप्त झाल्यानंतर माल विक्रीसाठी…

January 19, 2026
विद्यार्थ्याने गळफास घेतला; मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आत्महत्या केल्याचा दावा

मोठी बातमी! तरुणाने घरातील अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून संपविले जीवन; आत्महत्येचे कारण काय? मंगळवेढा पोलिस करणार कसून तपास

January 18, 2026
मंगळवेढ्यात रतनचंद शहा यांची आज १०३ वी जयंती; दहा वाजता प्रतिमेचे पूजन करण्यात येणार

दिव्यांग बांधवांनो! स्व.रतनचंद शहा यांच्या जयंतीनिमित्त ३०० दिव्यांगांना कृत्रिम अवयव वाटप होणार; शहा कुटुंबीयांचा उपक्रम; नोंदणीसाठी ‘या’ नंबरवर करा संपर्क

January 18, 2026
खळबळ! आमिष दाखवून आमचा गट फोडण्याचा प्रयत्न; प्रशांत परिचारक, शिवानंद पाटलांचा आमदार आवताडे गटावर गंभीर आरोप

भाजपच्या आजी-माजी आमदारांकडून ZP साठी स्वतंत्र मुलाखती; परिचारकांकडून गावभेट दौरा, तर आवताडेंनी इच्छुकांना बोलावले मंगळवेढ्यात

January 17, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

जिल्हा परीषद व पंचायत समितीसाठी नामनिर्देशन अर्ज योग्यरित्या भरण्यासंदर्भात आज राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन

January 17, 2026
Next Post
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मोठा उपक्रम! मंगळवेढा तालुक्यातील 'एवढ्या' शेतरस्त्यांना मिळणार नवे संकेतांक; शेतकऱ्यांना १२ फूट रस्ता देणारे ठरले पहिले राज्य; तहसीलदार मदन जाधव

ताज्या बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल सावंत जिल्हा परिषद ‘या’ गटातून निवडणूक रिंगणात उतरणार; विरोधी गटातील नेत्यांकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता

January 20, 2026
कौतुकास्पद! जयराम आलदर यांना सोलापूर मुख्याध्यापक संघाने दिली मोठी जबाबदारी; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

कौतुकास्पद! जयराम आलदर यांना सोलापूर मुख्याध्यापक संघाने दिली मोठी जबाबदारी; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

January 20, 2026
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

नेता असावा तर असा..! कार्यकर्त्यांच्या घामाला संधी मिळावी म्हणून स्वेच्छेने एक पाऊल मागे घेत मंगळवेढा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून घेतली माघार

January 20, 2026
जिल्ह्यात वस्तुंच्या अवैध साठेबाजीसाठी गावस्तरावर समित्या

खळबळ! साहेब आता तिकीट द्या, नाहीतर दोरी द्या, इथंच…. समर्थकाची अजब मागणी

January 19, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

उपरा नको.. आमचाच उमेदवार हवा! मंगळवेढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नेत्यांची झाली चांगलीच गोची…

January 19, 2026
कार्यकर्त्यांनो कामाला लागा! सिध्देश्वर आवताडे विधानसभा निवडणूकीच्या मैदानात उतरणार; बबनराव आवताडे गटाने आवळली वज्रमुठ

आनंदाची बातमी! शेतकऱ्यांसाठी मंगळवेढ्यात मका हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ; एसएमएस प्राप्त झाल्यानंतर माल विक्रीसाठी…

January 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..