टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेच्या आखाड्यात काँग्रेसने उमेदवारी जाहीर करून 12 तास उलटण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भैरवनाथ कारखान्याचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जात आहे.
मंगळवेढा-पंढरपूरच्या जागेवरून गेले आठवडाभर उमेदवार निवडीवरून रनकंदन सुरू होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून मधून जवळपास डझनभर इच्छुक होते त्यामुळे त्या इच्छुकातून कुणाला संधी मिळणार याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच
कालचा रात्री काँग्रेसने जाहीर केलेल्या 14 उमेदवाराच्या यादीत भगीरथ भालकेचे नाव जाहीर करण्यात आल्याच्या घटनेला काही तास होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या आखाड्यात
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक असलेल्या अनिल सावंत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज संभाव्य इच्छुक राहुल शहा, चंद्रशेखर कौडूभैरी, सुभाष भोसले, संतोष रंदवे यांच्या उपस्थित दाखल केला.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचे काम केले म्हणून भगीरथ भालके यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती मात्र गेल्या आठवडाभरापासून राष्ट्रवादीच्या जागेसाठी रणकंदन सुरू होते.
काल ही जागा काँग्रेसला सुटल्याचे सांगत भगीरथ भालके यांची उमेदवारी निश्चित केल्याच्या घटनेला काही तासाचा कालावधीत जाण्यापूर्वीच अनिल सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
पंढरपूरच्या पोटनिवडणुकीने महाविकास आघाडी सरकारचा कार्यक्रम झाला त्याच पद्धतीने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील पुन्हा महाविकास आघाडीत फूट पडणार का? या निमित्ताने बोलले जात आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी अधिकृत पणे अनिल सावंत यांना AB फॉर्म दिल्यास कॉग्रेसचे भगीरथ भालके यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून हा मतदारसंघातील जनता शरद पवार यांना मानत आली आहे. आजपर्यंत शरद पवार व या मतदारसंघाचे वेगळे नाते राहिले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज