मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारे यांनी रात्री मंगळवेढा तालुक्यातील कात्राळ येथे असणाऱ्या पोलीस तपासणी नाक्याला भेट देऊन पहाणी केली,
दरम्यान, या तपासणी नाक्यावर १ लाख ८० हजार रुपयाची रोकड सलगर या व्यक्तीच्या कडे सापडल्याने ती पोलिसांनी जप्त केले असून त्याची शनिवारी शहानिशा करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर अधीक्षक हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक रणजित माने उपस्थित होते.
यावेळी फुलारे म्हणाले, कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमा भागात नाक्यांची कडक तपासणी करण्यात येत असून, सोलापूर जिल्ह्यामध्ये बारा ठिकाणी तपासणी केली जात आहे, पोलिसांनी सतर्क राहून कारवाया सुरू केले आहेत, रोख रक्कम, गुटखा
पोलिसांकडून जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. दरम्यान फुलारे यांनी या चेक पोस्टवर उपस्थित असणाऱ्या कर्नाटकाच्या अधिकाऱ्यांना बोलून त्यांच्याकडून ही माहिती जाणून घेतली.
जीवनात यश मिळवायचे असेल तर शॉर्टकट नसतो
फुलारे यांनी कै.आमदार भारत भालके अकादमीला भेट देऊन येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीला शॉर्टकट नसतो. त्यामुळे कठीण परिश्रम घ्या.
मोकळ्या वातावरणात तयारी करा व परीक्षेला विस्तृतपणे वाचन करून सामोरे जा. या वेळी अकॅडमीचे संचालक श्रीकांत पवार यांची स्वागत केले. माजी यावेळी माजी सभापती संभाजी गावकरे उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज