टीम मंगळवेढा टाईम्स।
खात्यातील पैसे वडिलांना फसवणूक मुलाने काढल्याप्रकरणी बापाने आपल्या पोटच्या मुलावर गुन्हा दाखल केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे.
बार्शी तालुक्यातील हळदुर्ग येथे राहणाऱ्या महादेव मोहिते यांच्या बँक खात्यातून त्यांच्याच मुलाने बनावट सही करून २९ एप्रिल रोजी ४८ हजार रुपये आणि 10 जून रोजी दोन हजार असे ५० हजार रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याप्रकरणी वडिलांनी मुलाच्या विरोधात वैराग पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत वैराग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी महादेव मोहिते यांनी उपळे (दु) येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत १ फेब्रुवारी रोजी नवे जुने खाते केले होते.
त्यानंतर फिर्यादीच्या खात्यामध्ये अनुदानाची पन्नास हजार रक्कम जमा झाली होती.त्यानंतर २६ जुलै रोजी गावातील सोसायटीचे सेक्रेटरी तात्यासाहेब साठे यांनी फिर्यादीला सांगितले की, तुमच्या खात्यावर पन्नास हजार रुपये अनुदान जमा झाले आहे.
त्यानंतर मोहिते २८ जुलै रोजी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपळे (दु.) खात्यावरील पन्नास हजार रुपये जमा झालेले पैसे काढण्याकरता बँक मॅनेजर यांच्याकडे गेले असता बँक मॅनेजर यांनी खात्यावर १८०० रुपये शिल्लक असल्याचे सांगितले.
त्यावेळी बँक मॅनेजर यांना खात्यावर अनुदान जमा झालेली रक्कम कोणी काढली, असे विचारले असता त्यांनी खात्यावरची रक्कम तुमचा मुलगा अविनाश महादेव मोहिते याने तुमच्या खात्याचा येथे चेक आणून त्यावर दि. २९ एप्रिल रोजी ४८ हजार व दि. १० जून रोजी दोन हजार रुपये काढून घेऊन गेला आहे, असे सांगितले.
त्यावेळेस बँकेकडून खात्यावरून पैसे काढलेल्या चेकची झेरॉक्स प्रत मागून घेतली. त्यानंतर याबाबतचा जाब विचारण्यासाठी वडिलांनी घर गाठल्यानंतर त्यांना मुलाकडून खरी माहिती कळाली. त्यानंतर वैराग पोलीस ठाण्यामध्ये मुलगा अविनाश मोहिते याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा त्याच्या वडिलांनी दाखल केला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज