टीम मंगळवेढा टाईम्स ।
रक्षाबंधन हा भावा-बहिणीच्या नात्यातील प्रेम वाढवणारा सण. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर संरक्षक धागा म्हणजेच राखी बांधते आणि भाऊ देखील आपल्या बहिणीची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
राखी बांधताना बहिणी भावांना भरभरून मिठाया भरवतात आणि भावांकडून चांगलेच लाड करून घेतात.
पण सध्या मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे राखी पौर्णिमावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.
याचा परिणाम राखी विकणाऱ्या दुकानदारावर ही होताना दिसत आहे. राखी खरेदीसाठी नागरीक येत नाही म्हटल्यावर त्यांनी खरेदी केलेल्या किमती पेक्षा कमी किमतीत राखी देण्यास सुरुवात केली आहे.
मंगळवेढा शहरातील जिजामाता बँके शेजारी असलेल्या मधुकर नलवडे यांच्या सद्गुरु गिफ्ट मध्ये कोणतेही राखी फक्त 10 रूपयात दिली जात आहे.
सध्या पावसाने राज्यात पाठ फिरवली आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे घेतला निर्णय
मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ऐन राखी पौर्णिमेच्या तोंडावर ग्राहकानी दुकानाकडे पाठ फिरवली असल्यामुळे मोठा तोटा सहन करावा लागत आहे. सर्व प्रकारच्या ब्रँडेड राख्या फक्त दहा रुपयाला देण्याचा निर्णय घेतला. – मधु नलवडे
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज