टीम मंगळवेढा टाईम्स ।
पाचवी ते आठवीचे वर्ग वाढण्यासाठी एका स्वयंअर्थसहाय शाळेने वर्गवाढीच्या परवानगीची मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहारा यांच्याकडे केली होती.
सुट्ट्यांमुळे पैसे द्यायला थोडा विलंब झाला होता. सोमवारी तक्रारदाराला कार्यालयात बोलावून त्याच्याकडून २५ हजार रुपये स्वीकारले.
त्यावेळी परिसरात दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी लोहार यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर पुढील कारवाई केली जात आहे.
झेडपीच्या प्राथमिक शाळांची स्थिती सुधारण्याच्या बाता मारत शिक्षकांना उपदेशाचे धडे देण्यामुळे शिक्षणाधिकारी किरण लोहार चर्चेत होते.
त्यांच्याविरूध्द जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे अनेक शिक्षकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी स्वामी यांनी लोहार यांना नोटीस काढून काहीही न बोलण्याचा सल्ला दिला होता.
रविवारी लोहार यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता.
त्याच्या दुसऱ्याच दिवशी ते लाच घेताना रंगेहाथ पकडले, हे विशेष. लाचलुचपतचे पोलिस निरीक्षक उमेश महाडिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज