टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्हा परिषदेची तहकूब झालेली सर्वसाधारण सभा उद्या सोमवारी डॉ.निर्मलकुमार फडकुले सभागृहात दुपारी दोन वाजता होणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सभा ऑनलाइन घ्यायची की सभागृहात, मग सभागृह नेमके कोणते ? यावर वादावर प्रशासनाने अखेर समन्वयातून तोडगा काढला.
शासनाच्या नियमानुसार सभागृहाच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांची उपस्थितीत ठेवून सभा घेणे अपेक्षित आहे. त्यानुसार डॉ.फडकुले सभागृहात सभा घेण्याची तयारी केली.
त्याबाबत महापालिकेस पत्रव्यवहार केला. पालिकेने त्यास लेखी मान्यता अद्याप दिली नाही. पण, त्या सभागृहाची क्षमता ३०० आसनाची आहे. सभेसाठी सदस्य , पंचायत समिती सभापती व खातेप्रमुख , कर्मचाऱ्यांची एकत्रित संख्या १०० पर्यंत होते.
सभागृहाच्या ५० टक्के क्षमतेपेक्षाही कमी संख्या असल्याने सभा फडकुले सभागृहात घेणे योग्य असल्याची भूमिका उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांना पटवून दिली.
त्यानुसार सभा घेण्यास होकार दिला. विषयपत्रिकेवर १४ व आयत्यावेळचे १६ विषय आहेत.सर्वसाधारण सभेत सौरपथ दिवे, आपलं सरकार सेवा सुविधा केंद्र आदी विषयांवरून घमासान होण्याची शक्यता आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज