टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या 11 तालुक्यातील ग्रामीण भागात आज नव्याने 342 जणांची भर पडली असून कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 11 हजार 213 वर गेली आहे.तर कोरोनामुळे आतापर्यंत 324 मृत्यू झाला आहेत. 3 हजार 47 रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 7 हजार 842 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
आज प्राप्त झालेल्या 3 हजार 8 कोरोना चाचणी अहवालांपैकी 2 हजार 666 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 342 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर कोरोना मुक्त झालेल्या 190 जणांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आज ‘या’ भागात नव्याने आढळलेल्या बाधित
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, चोखामेळानगर, माळी गल्ली, न्हावी गल्ली, सराफ गल्ली, शेळवेवाडी, सांगोल्यातील दत्तनगर, हुपरी, काडलास, कुंभार गल्ली, परीट गल्ली, तिप्पेहळी, वाळेखिंडी या ठिकाणी नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
पंढरपूर तालुक्यात भाळवणी, भोसे, गोकुळनगर, गोपाळपूर, कासेगाव, क्रांती चौक, लक्ष्मी टाकळी, लिंक रोड, महावीर नगर, मनिषा नगर, मुक्ताबाई मठ, ओमकार नगर, पळशी, पांढरेवाडी, पुळूज, सांगोला रोड, शेंडगेवाडी, सब जेल व वाखरी याठिकाणी नवीन कोरणा बाधित रुग्ण आढळले आहेत.
मोहोळमधील देशपांडे गल्ली, पाटकुल, सावळेश्वर, शेटफळ, यशवंत नगर, उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी व कोंडी, माढा तालुक्यातील दहिवली, दारफळ, कसबा पेठ, कुंभेज, कुर्डू, कुर्डूवाडी, लव्हे, म्हैसगाव, मोडनिंब, रोपळे, तांबवे, वडशिंगे या ठिकाणी नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
माळशिरस तालुक्यामध्ये अकलूज, आनंदनगर, भांबुर्डी, बोंडले, बोरगाव, माळशिरस कोर्टसमोर, गोरडवाडी, गुरसाळे, जांबुड, खुडूस, माळेवाडी, मरकरवाडी, मेडत, मोरोची, नातेपुते, पोस्ट ऑफिस जवळ माळशिरस, पठाण वस्ती, संग्रामनगर, श्रीपुर, तरंगफळ, तिरवंडी, यशवंत नगर याठिकाणी नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दर्गनहळ्ळी, होटगी स्टेशन, एनटीपीसी, नवीन विडी घरकुल, करमाळ्यातील दत्त पेठ, देवळाली, घोलप नगर, गुजर गल्ली, जेऊरवाडी, केम, राशिन पेठ, साडे, शाहूनगर, शिवाजीनगर, वेताळ पेठ, वीट, वांगी नंबर 2,अक्कलकोटमधील बुधवार पेठ, गळोरगी, गौडगाव खुर्द, हनूर, मैंदर्गी रोड, मैंदर्गी, वागदरी,
तर बार्शीतील आगळगाव रोड, अलीपुर रोडइ अलीपुर, बारंगुळे प्लॉट, बारबोले प्लॉट, बावी, भोसले चौक, ढगे मळा, डामरे गल्ली, देवगाव, धानोरे, गाडेगाव रोड, गवळी गल्ली, गवसाने कंपाऊंड, गोरमाळे, गौडगाव, कदम वस्ती, खानापूर रोड, खताळे प्लॉट, लोखंड गल्ली, मंगळवार पेठ, मनगिरे मळा, मिरगणे कॉम्प्लेक्स, नारी, पांगरी, परंडा रोड, पिंपळगाव धस, पोलीस ग्राउंड पाठीमागे बार्शी, रोडगा रस्ता, धनगर गल्ली, सावळी गल्ली, शेळगाव व्हाले, शिराळे, शिवाजी आखाडा, सोलापूर रोड, सोमवार पेठ, उंबरगे, वैराग, वाणी प्लॉट, येडाई विहीरजवळ बार्शी या ठिकाणी नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
आज ‘या’ भागातील सात जणांचा मृत्यू
मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथील पस्तीस वर्षिय महिला, पंढरपुरातील उमदे गल्लीतील 68 वर्षिय पुरुष , अक्कलकोटमधील प्रमिला पार्कमधील 65 वर्षिय पुरुष , अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील 65 वर्षिय पुरुष,बार्शीतील 28 वर्षिय महिला , पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील 25 वर्षिय महिला व पंढरपूर येथील टाकळी रोड परिसरातील 69 वर्षिय पुरुष अशा सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Seven killed in Solapur rural, 342 newly found corona infected
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज