टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने धुमाकूळ माजवला असून रविवारी 131 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील 29 हजार 53 व्यक्तींची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये 3 हजार 943 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.
रविवारी सापडलेल्या 131 रुग्णांचा त्यात समावेश असून चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील 2 हजार 248 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1 हजार 583 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
रविवारी ‘या’ तालुक्यात सापडले रुग्ण
सांगोल्यातील महूद, बिर्ला सिमेंट कंपनी, बोरामणी, हिपळे, होनमुर्गी, कंदलगाव, मुस्ती, वळसंग येथे 19 रुग्ण सापडले. त्यामध्ये बोरामणी 11, यावलीत सात, रिधोऱ्यात 12, करमाळ्यातील बागवान नगरात नऊ रुग्ण (सर्वाधिक) सापडले आहेत.तर मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथे ILI आजाराचा एक रुग्ण सापडला आहे.
पंढरपुरातील भोसले चौक, चितळे वाडा, गोविंदपुरा, हनुमान मैदान, जुनी पेठ, कालिकादेवी चौक, संत पेठ, स्टेशन रोड, वेदांत भक्त निवास, कासेगाव, लक्ष्मी टाकळी, पुळूज, सरकोली, तुंगत येथे 19 रुग्ण सापडले.
करमाळ्यातील भिम नगर, कानड गल्ली, मौलाली माळ, श्रावण नगर, सुमंत नगर, सुतार गल्ली, शेलगाव याठिकाणी 23 रुग्ण आढळले. माढ्यातील भांगे गल्ली, चांभार गल्ली, काटे वस्ती, इंडसइंड बॅंकेजवळ, सावली हॉटेलजवळ, शिवाजी नगर, कुर्डूवाडी, आलेगाव (बु.), पापनस, रिधोरे, उपळाई (बु.) या गावांत 31 रुग्णांची भर पडली.
माळशिरसमधील अकलूज, लवंग, संग्रामनगर, माळीनगर येथे सात, तर मोहोळमधील अनगर, भांबेवाडी, देवडी, नरखेड, वडवळ, यावली या गावांमध्ये 16 रुग्णांची वाढ झाली आहे. तर उत्तर सोलापुरातील बीबी दारफळ, कळमण, तळेहिप्परगा या गावांमध्ये चार, आणि अक्कलकोटमधील देशमुख गल्ली, नऱ्हेगाव, सिन्नूर, तडवळ, उडगी या गावात पाच रुग्ण सापडले.
रविवारी ‘या’ ठिकाणच्या चौघांचा बळी
रविवारी वैराग येथील 70 वर्षीय महिलेचा, बार्शीतील सुभाष नगरातील 65 वर्षीय पुरुष, उत्तर सोलापुरातील नान्नज येथील 78 वर्षीय पुरुषाचा आणि अक्कलकोटमधील समर्थ चौकातील 65 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
अक्कलकोट तालुक्याची रुग्णसंख्या 481, बार्शी 817, करमाळा 154, माढा 257, माळशिरस 242, मंगळवेढा 119, मोहोळ 279, उत्तर सोलापूर 307, पंढरपूर 560, सांगोला 117 आणि दक्षिण सोलापुरातील रुग्णसंख्या 610 झाली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज