समाधान फुगारे । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या गुरुवारी 416 झाली असून आज 15 नवे रूग्ण आढळून आले आहेत . यात अक्कलकोट तालुक्यात 3 व करमाळा तालुक्यात 2 तर मोहोळ मध्ये 1 रुग्ण,दक्षिण सोलापूर 3,बार्शी तालुक्यात 6 असे आज मंगळवारी 15 नवे रुग्ण आढळून आले आहेत.तर वैराग बार्शी येथील 58 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ( Solapur rural corona virus update )
आज ग्रामीण भागातील ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून ) 204 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 15 पॉझिटिव्ह आहेत तर 189 निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 416 झाली आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यात 19 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 178 जण घरी परतले आहेत. 219 जणांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान आज खडकपुरा , करमाळा .समर्थ नगर अक्कलकोट . विजय नगर , अक्कलकोट . करजगी , ता . अक्कलकोट . भवानी पेठ , बार्शी . आदर्श नगर , नागने प्लॉट , बार्शी . वैराग , ता.बार्शी . वाळुज , ता.मोहोळ . होटगी , ता.दक्षिण सोलापूर . हात्तुर , ता.दक्षिण सोलापूर . कुंभारी , ता.दक्षिण सोलापूर . सब जेल तहसिल ऑफीस , बार्शी . वैराग , ता.बार्शी . जिंती , ता.करमाळा या ठिकाणी नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तालुका निहाय एकूण कोरोनाबाधितांची संख्याः
अक्कलकोट 79 , बार्शी 57 , करमाळा 3 , माढा 8 , माळशिरस 5 , मोहोळ 24, उत्तर सोलापूर 45 , पंढरपूर 21 , सांगोला 3, दक्षिण सोलापूर 171 . असे एकूण 416 रुग्ण आढळले आहेत.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज