टीम मंगळवेढा टाईम्स ऑनलाइन।
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 159 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर कोरोनामुळे आज सात पुरुषांचा बळी गेला आहे. कोरोनामुक्त झाल्याने 101 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
आज 3 हजार 344 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 3 हजार 185 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 159 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सोलापूरजिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या आता 31 हजार 951 एवढी झाली आहे. त्याचबरोबर 948 जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये अद्यापही एक हजार 824 जण उपचार घेत आहेत तर कोरोनामुक्त झाल्याने 29 हजार 179 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
आज ‘या’ गावातील सात जणांचा मृत्यू
माढा तालुक्यातील दारफळ येथील 70 वर्षाचे, अकलूज (ता. माळशिरस) येथील 70 वर्षाचे, औराद (ता.दक्षिण सोलापूर) येथील 70 वर्षाचे, हत्तूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील 75 वर्षाचे,
तर बंकलगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील 80 वर्षाचे, नवी पेठ पंढरपूर येथील 78 वर्षाचे तर शेटफळ (ता. मोहोळ) येथील 74 वर्षाच्या पुरुषांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज