मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
उकाड्याने त्रस्त असलेल्या सोलापूरकरांना अवकाळी पावसाचा दिलासा मिळणार आहे. आज रविवार, १३ एप्रिल ते मंगळवार १५ एप्रिल हे तीन दिवस अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाकडून तीन दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे.
शनिवार १२ एप्रिल रोजी ४०.२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. शुक्रवारच्या तुलनेने तापमानात ०.२ अंश सेल्सिअसची वाढ झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस पडल्यास तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सोलापूरकरांना ऊन आणि उकाड्यापासून दिलासा मिळेल. हवामान विभागाकडून दिला जाणारा ‘येलो अलर्ट’ म्हणजे सावधगिरीचा इशारा असतो. या तीन दिवसात हवामानात अचानक बदल होऊ शकतात.
वादळ, विजांचा कडकडाट, जोरदार वारा, अवकाळी पाऊस पडू शकतो. येलो अलर्ट हा तत्काळ धोक्याचा इशारा नसतो, पण नागरिकांनी सावध राहणे गरजेचे असते.
गरज नसताना घराबाहेर पडणे टाळणे, शेतीची व घरोघरीची खबरदारी घेणे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अशी काळजी घ्यावी लागते.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज