टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातून कोरोनाबाबत दिलासादायक बातमी आली आहे. तालुक्यातील 11 कोरोनाबाधिताची प्रकृती उपचारांनंतर आता उत्तम असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. तर आज 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे.
कोरोना संसर्ग बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मंगळवेढा तालुक्यातील आत्तापर्यंत 170 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर आज तालुक्यात 1 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून एकूण रुग्ण संख्या आता 290 वर गेली आहे.
आज दि.16 ऑगस्ट रोजी 17 जणांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत. तसेच आज 5 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. 5 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट केलेल्या नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे आज 1 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे.
मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 290
रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 170 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आज पर्यंत 117 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, 11 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला असला तरी दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांची संख्या ही चिंताजनक बाब आहे. नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. कोणीही घराबाहेर पडू नये. गर्दी न करता आपण कोणत्याही संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही आणि आपल्याला कोरोनाची लागण होणार नाही, याची काळजी घ्यावी. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज