समाधान फुगारे । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने हाहाकार माजवला असून आज मंगळवेढा शहरात 7 तर ग्रामीण भागात 13 असे 20 नवे रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 250 वर गेली आहे.
आज दि.12 ऑगस्ट रोजी 39 जणांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत. तसेच आज 156 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. 156 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आणि 143 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
सदर नागरीक हे तामदर्डी -3 , बोराळे -2 , आंधळगाव -1 , भोसे -2 , मंगळवेढा शहर -5 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत स्वब ( RT – PCR ) चे 7 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण मौजे आंधळगाव -2 , मरवडे -3 , मंगळवेढा शहर -2 येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 250
रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 117 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आज पर्यंत 131 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज