टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोनाने धुमाकूळ घातला असून आज पुन्हा 14 नव्या रुग्णाची भर पडली असून एकूण बाधितांची संख्या 174 वर गेली आहे.
आज दि.5 ऑगस्ट रोजी 04 जणांचे स्वॅब(RT-PCR) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत.तसेच आ 578 रॅपीड ॲन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.
आज घेण्यात आलेल्या 578 रॅपीड ॲन्टीजन टेस्ट पैकी 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आणि 564 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
‘या’ भागात आढळले नवे रुग्ण
मंगळवेढा -1, बोराळे-2, सलगर-3, आंधळगाव-1, मरवडे-7 असे एकूण 14 रुग्ण सापडले आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत स्वॅब (RT-PCR) चे आज अहवाल प्राप्त झाले नाहीत.
मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 174
रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 80 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आज पर्यंत 93 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज