
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आज 14 ने वाढून 196 झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शुक्रवारी सायंकाळी दिली. आज एकाच दिवशी बाधितांची संख्या 14 ने वाढल्याने सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. काल गुरुवारी रात्री पर्यंत सोलापुरातील बाधितांची संख्या 182 होती. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, आज एका दिवसात सोलापुरात 170 चाचणी अहवाल आले यात अहवाल 156 निगेटिव्ह तट 14 पॉझिटिव्द आले आहेत. यामध्ये 8 पुरुष तट 6 स्त्री असून 1 स्त्रीचा मृत्यू झाला आहे.
आज आढळून आलेले नवे रुग्ण
गवळी वस्ती जुना कुंभारी रोड एक पुरुष , शास्त्रीनगर एक पुरुष हुडको नंबर तीन कुमठा नाका एक पुरुष , सिविल हॉस्पिटल च्या पाठीमागे समर्थनगर येथील एक स्त्री , न्यू पाच्छा पेठ गीता नगर येथील एक पुरुष भारतरत्न इंदिरा नगर येथिल एक स्त्री , संजय नगर कुमठा नाका येथील एक पुरुष , रविवार पेठेतील एक स्त्री न्य पाच्छा पेठ । येथील दोन पुरुष आणि एक स्त्री मोदीखाना परिसरातील एक स्त्री सदर बाजार येथील । एक स्त्री सिद्धेश्वर पेठ येथील एक पुरुष असे एकूण 14 नव्याने रुग्ण आढळले आहेत.
सोलापूरात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी
आज १४ रुग्णांची भर; एकूण रुग्ण १९६, डिस्चार्ज दिलेले रुग्ण २९, मृत रुग्ण १३ तर १५४ रुग्णांवर उपचार सुरु
आज एकूण १७० जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी १५६ अहवाल निगेटिव्ह तर १४ अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच आज एकाच दिवशी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.
आज मृत्यू पावलेल्या व्यक्ती पैकी एक शास्त्री नगर परिसरातील ५६ वर्षीय महिला व रंगभवन परिसरातील ७६ वर्षीय व्यक्ती असून आज पहाटे उपचारादरम्यान या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
———————————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












