मंगळवेढा टाईम्ससोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आज 31 ने वाढून 308 झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज बुधवारी सायंकाळी दिली. पुन्हा आज बाधितांची संख्या 31 ने वाढल्याने सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. काल मंगळवारी कोरोना बाधितांची संख्या 277 इतकी झाली होती. दरम्यान , आतापर्यंत 72 जण कोरोना मुक्त झाले होते. आज बुधवारी 129 अहवाल प्राप्त झाले या मध्ये 98 निगेटिव्ह तर 31 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. प्रलंबित अहवाल 142 आहेत . तर 2 व्यक्ती मयत आहेत.
मयतांमध्ये 1 गुरूनानक नगर येथील 60 वर्षीय पुरूष तर इंंदिरा वसाहत येथील 72 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
———————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज