टीम मंगळवेढा टाईम्स ।
महिलांनाही प्रतिनिधित्व मिळावे, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्याभरात महिलांच्या ग्रामसभा घेण्यात येणार आहे.
या सभांमधून महिलांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ग्रामीण भागातील बालकांचे प्रश्न समजून घेत बालसभा घेण्यात आल्या त्याच धर्तीवर महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी गावागावात महिला सभा घेण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेचे प्रशासन सध्या आषाढी वारीच्या तयारीत आहे. त्यानंतर पीआरसी कमिटीचा दौरा होणार आहे. यामुळे महिला ग्रामसभेचे आयोजन १५ जुलै नंतर करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील वंचित असलेल्या लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.
कागदपत्रे नसलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांनाही योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
परिचारक गटाची | नाराजी दूर होणार का ?
दामाजी कारखान्याची निवडणूक लागली आहे.या निवडणुकीच्या तोंडावर आता मंगळवेढा तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. विधानसभा निवडणुकीत समाधान आवताडे यांना आमदार करण्यासाठी परिचारकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
आता मात्र परिचारक गटातून आवताडे यांच्यावर नाराजीचा सूर उमटत आहे . बैठक घेऊन स्वतंत्र पॅनल करण्याची तयारी परिचारक गटाकडून करण्यात आली आहे.
यावर अद्याप स्वत : परिचारकांनी आपली भूमिका अद्याप मांडलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत ते बोलत नाहीत, तोपर्यंत राजकीय अंदाज बांधणे अवघड आहे.
सध्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असली तरी आवताडे आणि परिचारक एकत्रच फिरतात. त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून दोन्ही गटाची बैठक घेतल्यास मार्ग निघेल, अशीही चर्चा तालुक्यात सुरू आहे.
दोन्ही गट एकत्र येतील , असे गृहीत धरूनच विरोधकांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे . आवताडे – परिचारकांच्या विरोधातील सर्व गट एकत्र होणार की नाही, याची उत्सुकता लागली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज