mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात लेखा परीक्षकांच्या तपासणीमुळे दवाखान्याची लबाडी आली समोर; जादा घेतलेले ३५ लाख परत करण्याचे आदेश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 26, 2021
in सोलापूर
मंगळवेढ्यातील कोरोना रुग्णांची लूट थांबवण्यासाठी प्रशासन कोणती पावलं उचलणार?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दहा तालुक्यांत खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या ५ हजार ६३३ बिलांची तपासणी करण्यात आल्यावर संबंधित हॉस्पिटलनी ३५ लाख ५१ हजारांचे जादा बिल आकारल्याचे लेखा परीक्षणातून उघड झाले आहे.

संबंधित हॉस्पिटलनी जादा आकारलेले बिल रुग्णांना परत करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांना हैराण केले.

कोरोना उपचारासाठी ९२ हॉस्पिटलमध्ये सोय करण्यात आली. यात जवळपास ७० हॉस्पिटल खासगी आहेत. कोरोनाची लागण झालेल्या अनेकांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्याने खासगी हॉस्पिटलचा रस्ता धरला, तर काही जणांनी चांगली सुविधा मिळते म्हणून स्वत:हून खासगी रुग्णालयात उपचार घेतले.

गरिबांना मात्र खासगी रुग्णालयात उपचार घेणे महागात पडले आहे. अनेकांनी नाइलाजाने दागिने मोडून, सावकाराकडून कर्ज घेऊन दवाखान्याचे बिल भरल्याचे दिसून आले आहे. कोविड सेंटर चालविणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनाकडून मात्र रुग्णांना कोणतीच दया दाखवली नसल्याचे दिसून येत आहे.

याउलट अनेकांनी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल उकळल्याचे दिसून आले आहे. कोरोनाकाळात खासगी कोविड हॉस्पिटलकडून रुग्णांची पिळवणूक होऊन नये म्हणून जिल्हाधिकारी शंभरकर यांनी तहसीलमार्फत प्रत्येक तालुक्यास लेखा परीक्षकांची नियुक्ती केली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लेखा परीक्षक अजय पवार यांच्याकडून तालुक्यातील खासगी रुग्णालयांच्या बिलाच्या तपासणीबाबत आढावा घेतला जात आहे.

२३ मेपर्यंत दहा तालुक्यांतील लेखा परीक्षकांनी ५ हजार ६३३ बिलांची तपासणी केली आहे. यामध्ये दवाखान्यांनी ३५ लाख १४ हजार २७३ रुपये जादा बिल लावल्याचे आढळून आले आहे. ज्या रुग्णालयांनी हे जादा बिल वसूल केले आहे, त्यांनी संबंधित रुग्णांना हे बिल परत करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

लेखा परीक्षकांच्या तपासणीमुळे दवाखान्याची लबाडी समोर आली आहे. काेरोनाकाळात कोविड सेवा देणाऱ्या हॉस्पिटलनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे बिल आकारणी करणे अपेक्षित आहे, असे असताना अनेकांनी रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिल आकारून सेवेत पाप केल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यातील अकरा तालुक्यांपैकी अक्कलकोट तालुक्यात एकही खासगी कोविड हॉस्पिटल कार्यरत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या तालुक्यातील शून्य बिलाची तपासणी झाली. बार्शी तालुक्यात संसर्ग जास्त आहे व या ठिकाणी खासगी दवाखानेही जास्त आहेत.

बार्शीत १ हजार ८२८ बिलांची तपासणी होऊन १९ लाख १२ हजार परत करण्याचे आदेश झाले आहेत. माळशिरसमध्ये १ हजार २६ बिलांची तपासणी होऊन ३ लाख ६१ हजार, पंढरपूरमध्ये ७०२ बिलांची तपासणी होऊन ९ लाख ६० हजार रुपये परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बिलासाठी काय आहेत नियम

खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी बिल आकारण्यास सरकारने तीन टप्पे केले आहेत. जनरल वॉर्ड: ४ हजार, ऑक्सिजन: ७ हजार ५००, व्हेंटिलेटर: ९ हजार, त्याचबरोबर जनरल वाॅर्ड पीपीई किटसाठी ६०० रुपये, ऑक्सिजन वॉर्ड: १ हजार, आयसीयू: १२०० रुपये. असे असताना जनरलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन लावल्याचे दाखवून तसेच पीपीई किटचा जादा चार्ज लावल्याचे दिसून आल्याचे पंढरपूरचे लेखा परीक्षक सदावर्ते यांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना औषधसोलापूरहॉस्पिटल

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

June 1, 2026

तरुणांनो सावधान! बॉडी फुगवण्यासाठी वापरले जाणारे घातक इंजेक्शन विकणारे रॅकेट जेरबंद; २ लाखांचा मुद्देमाल जप्त; सोलापूर जिल्ह्यात अवैध नशिल्या इंजेक्शनचा काळा बाजार उघड

June 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक फायनल? अधिकृत घोषणा बाकी; मात्र भाजपच्या ‘त्या’ नेत्याच्या एन्ट्रीने सस्पेन्स वाढला

May 30, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
Next Post
संतापजनक! मंगळवेढ्यात अठरा वर्षीय मुलीवर अत्याचार; दोघाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल

नागेश हेगडेच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्यावर मनुष्यवधाचा व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; होलार समाज संघटनेची मागणी

ताज्या बातम्या

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

June 2, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पंढरपूरनजीकच्या ‘त्या’ विचित्र अपघाताने हिरावला उमदा तरुण; मंगळवेढ्यातील भावी वकिलाची मृत्यूशी झुंज अपयशी

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा