मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
नियमाचे पालन न करणाऱ्या रासायनिक खते, बी बियाणे व कीटकनाशके विक्रेते यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्ह्याचे कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी मंगळवेढा येथे खरीप हंगाम पुर्व तयारी प्रसंगी कार्यक्रमात बोलताना दिला.
मंगळवेढा पंचायत समिती सभागृहामध्ये खरीप हंगाम सन २०२५-२६ या वर्षीच्या पूर्वतयारी करिता रासायनिक खते, बी बियाणे व कीटकनाशके विक्रेते यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदर सभेमध्ये कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी निविष्ठा विक्रेते यांना मार्गदर्शन केले तसेच त्यांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व सेवा देण्याचे आवाहन केले.
जे खत बियाणे विक्रेते नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचे संकेत दिले. दरम्यान वेळप्रसंगी गुन्हे दाखल करण्याचे ही सूचना दिलेल्या आहेत.
सागर बारवकर जिल्हा कृषी अधिकारी यांनी बियाणे नियम बियाण्याचे आदेश तसेच बी बियाणे विक्रेते यांच्या होणाऱ्या चुका याविषयी मार्गदर्शन केले. अजय वगरे मोहीम अधिकारी यांनी कीटकनाशके लेबल क्लेम याविषयी यांना मार्गदर्शन केले.
तसेच कीटकनाशके व रासायनिक खते यांच्या कायद्यातील तरतूद विषयी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी मंगळवेढा मनीषा मिसळ यांनी खत व बियाणे विक्रेते नियमातील तरतुदीनुसार रेकॉर्ड ठेवत नसले बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. विक्रतेच्या वतीने कट्टे उद्योग समूहाचे संजय कट्टे यांनी सर्व निविष्ठा विक्रेते यांना नियमाचे पालन करणेविषयी खत व बियाणे विक्रेत्यांना आव्हान केले.
पंचायत समिती कृषी अधिकारी बाळासाहेब बाबर यांनी मंगळवेढ्यातील खरीप हंगामासाठी युरिया ९३२४ मे.टन, डीएपी २६९७ मे.टन., एमओपी ९३२ मे.टन, यशस्वी २३३१ मे.टन, मिश्र खते ६८४१ मे.टन, अशी एकूण २२, २२६ मे.टन. खताची मागणी केल्याचे सांगितले.
त्यामुळे खरीप हंगामामध्ये खत कमी पडणार नाही अशी त्यांनी यावेळी ग्वाही दिली. तसेच बी बियाण्याच्या संदर्भामध्ये खरीप हंगामामध्ये ज्वारी ०.१६ क्विंटल, बाजरी २७९ क्विंटल, तुर १७क्विंटल, उडीद ३६३, मका २०९० क्विंटल, भुईमंग २०५ क्विंटल, सोयाबीन ११ क्विंटल असे एकूण ४२३१ क्विंटल बियाण्याची मागणी केल्याचेही ते म्हणाले.
तालुक्याचे प्रस्तावित खरीप क्षेत्र ३०,८५३ हेक्टर इतके आहे. त्यामुळे खरीप क्षेत्राला बियाणे कमी पडणार नाहीत. यावेळी रसायनिक खते, बी बियाणे व कीटकनाशके विक्रेते संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सावंत सचिव सिद्धेश्वर भगत, श्रीपाद कृषी केंद्राचे संचालक लोहकरे तसेच मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये आरसीएफ कंपनीकडून पॉज मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी आरसीएफ कंपनीचे प्रतिनिधी घोलप उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनिल डोरले, चंद्रकांत मिसाळ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब बाबर यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय मधुकरले यांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज