मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर गावात एक संतापजनक घटना समोर आली आहे. स्वतःच्या आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधांची वाच्यता होऊ नये यासाठी एका नराधम बापाने स्वतःच्या पोटच्या आठ वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून निर्घृण हत्या केली.
आरोपी ओगसिद्ध कोठे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी (दि. 23 मे) संध्याकाळच्या सुमारास कुसूर गावात एका आठ वर्षांच्या मुलीचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सुरुवातीला पोलिसांनी ही बाब आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदवली होती. मात्र मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असता, गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट झाले.
आरोपीचे स्वतःच्याच आईसोबत अनैतिक संबंध
या प्रकरणात मंद्रूप पोलीस ठाण्यात सहा पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी ओगसिद्ध कोठे याचे स्वतःच्याच आईसोबत अनैतिक संबंध होते.
मृत चिमुकली श्रावणी हिने स्वतःच्या वडिलांना आणि आजीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. या प्रकाराबाबत श्रावणीने कोणाला काही सांगू नये म्हणून नराधम बापाने तिला आधी बेदम मारहाण केली होती.
चिमुकलीचा गळा दाबून खून
यानंतर पत्नी वनिता कोठे घरी नसताना नराधम बापाने चिमुकलीचा गळा दाबून खून केला. इतक्यावरच न थांबता, मृतदेह घरासमोरच खड्डा खोदून पुरण्यात आला.
गावातील पोलीस पाटील महानंदा पाटील यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस प्रशासनाला खबर दिली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मुलीचा मृतदेह बाहेर काढून तपास सुरू केला. या प्रकरणी आरोपी ओगसिद्ध कोठे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत असून, आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
सोलापुरात गोठा कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू
दरम्यान, मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावात गोठा कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तानुबाई मारुती गायकवाड असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. शुक्रवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस सुरू असताना तानुबाई गायकवाड या जनावरांच्या गोठ्यात बसल्या होत्या. त्यावेळी अचानक गोठा कोसळला आणि तानुबाई गायकवाड या गोठ्यात अडकल्या.
संध्याकाळी कुटुंबीय ज्यावेळी शेतात आले तेव्हा त्यांना तानुबाई या गोठ्याखाली अडकलेल्या अवस्थेत दिसल्या. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. या घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज