टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर शहरात सोमवारी 144 नवे रुग्ण सापडले आहेत तर तिघांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये रेल्वे लाईन परिसरातील 82 वर्षीय, मेरगू टॉवरजवळील सूत मिल परिसरातील 50 वर्षीय पुरुष तर सिध्देश्वर पेठेतील 72 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. Solapur city Today again 144 new disruptions; Death of three
आजपर्यंत सोलापूर शहरातील 30 हजारांहून अधिक व्यक्तींची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यामध्ये 4 हजार 707 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रविवारी सर्वाधिक 3 हजार 47 व्यक्तींची रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 144 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
‘या’ भागात आढळले नवे रुग्ण
मुरारजी पेठ, एन.जी. मिल चाळ, कुमठे तांडा, लक्ष्मी नगर (हत्तुरे नगर), सत्तर फूट रोड, रेवणसिध्देश्वर नगर, बुधवार पेठ, वसंत विहार व राधाकृष्ण कॉलनी, गवळी वस्ती (दमाणी नगर), कमल शेरी अपार्टमेंट (बुधवार पेठ), नागनाथ सोसायटी (एमआयडीसी), ऋषि नगर, थोबडे वस्ती (लक्ष्मी पेठ), इंदिरा झोपडपट्टी, सिध्देश्वर पेठ, नंदीकेश नगर (शेळगी), दत्त मंदिराजवळ (देगाव), पश्चिम मंगळवार पेठ, दक्षिण सदर बझार, हुच्चेश्वर नगर, वर्धमान नगर, रत्नमंजिरी सोसायटी, शिवगंगा नगर, सुभाष नगर,
मंगल विहार अर्पाटमेंट (जुळे सोलापूर), भवानी पेठ, महापालिका कॉलनी (सात रस्ता), मोदी खाना, लोधी गल्ली, लक्ष्मी मंदिराजवळ, मजरेवाडी (मजरेवाडी), संतोष नगर, शिवाजी नगर (बाळे), काडादी चाळ, मेरगू टॉवर, पापराम नगर, संजय गांधी नगर (विजयपूर रोड), थोबडे वस्ती (जुना देगाव नाका), विडी घरकूल (हैदराबाद रोड), शिवगंगा नगर (पारशी विहिरीमागे),अवंती नगर, थोबडे नगर, निलकंठेश्वर मंदिराजवळ ,तिरुपती कॉर्नर (मोदी), शोभा नगर, मंजुषा हौसिंग सोसायटी, राजस्व नगर, इंद्रधनु सोसायटी, अमृता नगर, इंदिरा नगर, विष्णू नगर (नई जिंदगी),
लतादेवी नगर (कुमठा नाका), राम शेट्टी नगर, स्टेट बॅंक कॉलनी, विद्या नगर, शिंदे चौक, न्यू पाच्छा पेठ, बागवान नगर, राघवेंद्र नगर, केकडे नगर, कोटा नगर (जुना विडी घरकूल), माशाळ वस्ती (जुना पुना नाका), योगीराज महादेवी नगर, हरळय्या नगर (होटगी रोड), मड्डी वस्ती (कुमठे), शंकर नगर, आसरा हौसिंग सोसायटी, स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरे वस्ती), रोहिदास नगर याठिकाणी रविवारी नवे रुग्ण आढळले आहेत. त्याचा अहवाल महापालिकेने आज सोमवारी दिला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज