टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथील एका शेतकर्याची म्हैस चोरून नेल्याप्रकरणी नवनाथ दामू शिरसटकर(वय 32 रा. बोराळे),बाबू भगवान तोरणे(वय 25 रा.अरळी),रंजना दाजी चौरे(रा.मेथवडे) या तीघा आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
या घटनेची हकिकत अशी,यातील फिर्यादी हुसेन मुल्ला (रा.अरळी) या शेतकर्याची 40 हजार रुपये किमतीची मुरा जातीची म्हैस दि.5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वा. सिध्दापूर गावचे शिवारातील शेतातील वस्तीवर बांधलेली असताना अज्ञात चोरटयाने म्हशीच्या गळयातील मण्याचा कंडा तोडून म्हैस चोरून नेल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरिक्षक सत्यजीत आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार पोलिस नाईक हरीदास सलगर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून चोरीला गेलेल्या म्हशीचा परिसरातील नातेवाईकाकडे प्रथमतः शोध घेतला.
तदनंतर एक शिंग तुटलेली व कपाळावर पांढरा टिपका असलेल्या वर्णनाच्या म्हशीवरून सांगोला तालुक्यात तपासाची चक्रे फिरवली असता मेथवडे परिसरात कांबळे वस्तीवर मुरा जातीची चोरून नेलेली म्हैस मिळून आली.सदर घटनेत आरोपी नवनाथ शिरसट याने त्याची बहिण रंजना चवरे(रा.मेथवडे) हिला 40 हजार रुपये किमतीला ही म्हैस विकली होती.
या घटनेत चोरीचा माल विकत घेतल्याप्रकरणी पोलिसांनी रंजना चवरे हिलाही आरोपी केले आहे. तपासिक अंमलदार पोलिस नाईक सलगर यांनी म्हैस जप्त करून वरील तीन आरोपींना अटक करून मूळ मालकाच्या ताब्यात म्हैस देण्यात आली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज