टीम मंगळवेढा टाईम्स |
गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे श्री क्षेत्र शेगाव येथील श्री गजानन महाराज दिंडीचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारामध्ये उद्या शुक्रवार दि.4 जुलै रोजी सकाळी 6 वाजता आगमन होणार असल्याची माहिती मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुशील आवताडे यांनी दिली.
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या शेगाव येथील श्री गजानन महाराज दिंडीचा आज मंगळवेढा शहरात मुक्काम असून उद्या शुक्रवारी सकाळी गजानन महाराजांची पायी दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
या दिंडीसाठी मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सकाळी महाप्रसादाचे परंपरेप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गजानन महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे अतिशय उत्तम व नेटके नियोजन केले जाते.
शुक्रवारी सकाळी गजानन महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादासाठी मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, आडत व्यापारी,
कर्मचारी व बाजार समितीतील अन्य घटकांनी आवर्जून उपस्थित रहावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुशील आवताडे व व्यापारी महासंघ मंगळवेढा यांचेवतीने करण्यात आले आहे.
हा महाप्रसादाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन व मंगळवेढा तालुक्याचे ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सिद्धेश्वर आवताडे,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुशील आवताडे, सचिव सचिन देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक, कर्मचारी, आडत व्यापारी व व्यापारी महासंघाचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज