मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा तालुक्यातील लेंडवे चिंचाळे येथे एका १७ वर्षीय मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी रोहित श्रीरंग लेंडवे, शोभा श्रीरंग लेंडवे, जयश्री रामदास पवार, रामदास दुर्योधन पवार (रा. मेथवडे) या चौघाविरुध्द मंगळवेढा पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील बालविवाह लावणारी मुलगी ही १७ वर्षीय असल्याची कल्पना असतानाही
वरील आरोपीने संगनमत करुन दि.२० मे २०२५ रोजी दुपारी १२.३५ वाजता लेंडवे चिंचाळे येथील मुरारवाडी येथील घरासमोर बालविवाह लावून दिला असल्याची फिर्याद
सरकारपक्षाच्यावतीने ग्रामपंचायत अधिकारी अफरीन रफिक तांबोळी यांनी पोलीसात दिली असून याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार धनंजय आवताडे हे करीत आहेत.
दरम्यान बालविवाह करणे हा कायदयाने गुन्हा आहे याची माहिती असतानाही समाजामधील आई, वडिल बालपणीच विवाह करुन आपल्या डोक्यावरील ओझे कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे या घटनेवरुन स्पष्ट होत आहे.
भारत देश एकीकडे देशाचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करीत असताना बालविवाह होत असल्याने पालकांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज