mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात खळबळ! नामांकित शाळेच्या प्रवेशद्वारावरच मध्यरात्री ‘अघोरी पूजा’; संशयिताविरुद्ध पोलिसांत तक्रार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 3, 2026
in क्राईम, मंगळवेढा
मोठा दिलासा! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10 हजार कोटींच्या पॅकेजची ठाकरे सरकार कडून घोषणा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग। 

​मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील नामांकित ‘स्वामी विवेकानंद विद्यालय व ज्युनिअर कॉलेज’ मधून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. २ जुलै २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरच एका इसमाने अघोरी पूजा केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

​पहाटे ५ वाजता नेमकं काय घडलं?

​शाळेने पोलिसांत दिलेल्या तक्रार अर्जानुसार, २ जुलै रोजी पहाटे ठीक ५:०५ वाजता गोणेवाडी येथील रहिवासी असलेल्या एका इसमाने प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये मंतरलेले पाणी आणि त्यात भंडारा टाकून ते शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ओतले. एवढ्यावरच न थांबता त्याने कोंबड्याचे पिल्लू शाळेच्या दिशेने फेकून अघोरी कृत्य केले.

​वसतिगृहातील मुलांनी पकडले रंगेहात

​हा अघोरी प्रकार सुरू असताना, शाळेच्या शेजारीच राहणाऱ्या वसतिगृहातील दोन विद्यार्थ्यांनी हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले.

या विद्यार्थ्यांनी तत्परता दाखवत तात्काळ जवळच राहणारे रहिवासी गवळी यांना याची माहिती दिली. मात्र, तोपर्यंत संबंधित इसम पूजा आटोपून गाडीवरून पसार झाला होता.

​आधीही सापडले होते लिंबू; सखोल चौकशीची मागणी

​या अघोरी कृत्यामुळे शाळेतील लहान मुलांमध्ये कमालीची घबराट निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही शाळेच्या परिसरात अनेक वेळा पूजा केलेले लिंबू आढळून आले होते, असेही अर्जदारांनी म्हटले आहे.

​पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

या गंभीर प्रकाराची दखल घेत स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी मंगळवेढा पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी या अर्जाची नोंद घेतली असून, या विकृत प्रवृत्तीच्या इसमाची सखोल चौकशी करून त्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मुख्याध्यापक आणि पालकांकडून केली जात आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सभापती दीपाली ताड यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! मंगळवेढा तालुक्यातील ७ जिल्हा परिषद शाळांना मिळाले नवीन शिक्षक; ​पालक वर्गातून व्यक्त होतोय आनंद

July 3, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

वटपौर्णिमेलाच सुहासिनीचा कुंकवाचा धनी हिरावला! ८ दिवसांत बेकायदा दारू विक्री बंद करा; अन्यथा महिला दारू धंद्यावर जाऊन बाटल्या फोडणार

July 3, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

कोर्टाच्या चकरा मारण्यापासून सुटका! मंगळवेढा दिवाणी न्यायालयात ‘विशेष लोकअदालत’; वाद मिटवण्याची मोठी संधी

July 3, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

कामाची बातमी! ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; मोफत राहणे, खाणे आणि १००% नोकरीची हमी; ‘प्रथम फाउंडेशन’ व पंचायत समितीचा मोठा पुढाकार

July 2, 2026
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

July 3, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​सणाच्या नावाखाली अश्लीलता! मंगळवेढ्यात विनापरवाना महिलांचे डान्स प्रोग्राम आयोजित करणाऱ्या ७ जणांविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई

July 1, 2026
सोलापुरात गोपीचंद पडळकरांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर ‘धनगर’ समाजाच्या नेत्यांनीच केला संयोजकावर खुनी हल्ला

मंगळवेढ्यात खळबळ! शेतरस्ता खुला करताना मंडल अधिकाऱ्याची धरली गच्ची; ६ जणांवर गुन्हा

July 1, 2026
कामाची बातमी! भेसळयुक्त ‘ॲनालॉग’ला नो एन्ट्री; मंगळवेढ्यातील हॉटेल ‘स्वाद’चा ग्राहकांच्या आरोग्यासाठी शुद्धतेचा विडा; अस्सल आणि दर्जेदार चवीची मेजवानी

कामाची बातमी! भेसळयुक्त ‘ॲनालॉग’ला नो एन्ट्री; मंगळवेढ्यातील हॉटेल ‘स्वाद’चा ग्राहकांच्या आरोग्यासाठी शुद्धतेचा विडा; अस्सल आणि दर्जेदार चवीची मेजवानी

July 1, 2026
वीरश्री महिला पतसंस्थेचा उद्या मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

महिला सक्षमीकरणासाठी ‘वीरश्री’ पतसंस्थेचे मोठे पाऊल; महिला उद्योजकांना केवळ ‘इतके’ टक्के व्याजदराने कर्ज, विविध ठेव योजनांचाही शुभारंभ

July 1, 2026

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सभापती दीपाली ताड यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! मंगळवेढा तालुक्यातील ७ जिल्हा परिषद शाळांना मिळाले नवीन शिक्षक; ​पालक वर्गातून व्यक्त होतोय आनंद

July 3, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

वटपौर्णिमेलाच सुहासिनीचा कुंकवाचा धनी हिरावला! ८ दिवसांत बेकायदा दारू विक्री बंद करा; अन्यथा महिला दारू धंद्यावर जाऊन बाटल्या फोडणार

July 3, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

कोर्टाच्या चकरा मारण्यापासून सुटका! मंगळवेढा दिवाणी न्यायालयात ‘विशेष लोकअदालत’; वाद मिटवण्याची मोठी संधी

July 3, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

शेतकऱ्यांनो! ट्रॅक्टर-बैलगाडी आता कोणीच अडवणार नाही; शेतीकामांसाठी मुरूम, वाळू, दगड मोफत

July 3, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

कामाची बातमी! ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; मोफत राहणे, खाणे आणि १००% नोकरीची हमी; ‘प्रथम फाउंडेशन’ व पंचायत समितीचा मोठा पुढाकार

July 2, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सिंघम रिटर्न! FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा दणका; बाजारपेठेतून सुटे तेल गायब, बनावट दूध, पनीर विक्रेते रडारवर; डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; भेसळखोरांचे धाबे दणाणले

July 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..