mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महाविकास आघाडीत मोठी घडामोड; शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी, वाचा काय आहेत पक्षादेश?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 30, 2021
in राज्य
महाविकास आघाडीत मोठी घडामोड; शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी, वाचा काय आहेत पक्षादेश?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्यात राजकीय वर्तुळात सध्या अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात सातत्याने कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे.

अशातच आता शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे. आगमी पावसाळी अधिवेशनासंबंधित हा व्हिप आहे.

पाच आणि सहा जुलै रोजी राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करून मंजूर करण्यात येणार आहे.

त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना या अधिवेशनास उपस्थित राहायचे आहे, असा व्हीप शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी जारी केला आहे. सध्या राज्यात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं रद्द केलेलं आरक्षण, मराठा आरक्षण, कोरोना रूग्णांची वाढती संख्या यांसारख्या अनेक मुद्यांमुळे हे पावसाळी अधिवेशन महत्वाचं ठरणार आहे.

यामुळे दक्षता म्हणून शिवसेनेनं आमदारांना व्हीप बजावला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, व्हिपचा साधासोपा अर्थ म्हणजे पक्षशिस्तीचं पालन करणे होय. व्हीपची संकल्पना ब्रिटिश काळातील आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचा एक व्हीप असतो.

आपल्या सर्व आमदारांवर नियंत्रण ठेवण्याचं काम या व्हीपने करायचे असते या साऱ्या घटनांवर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आज सायंकाळी विधीमंडळ अधिवेशनासाठी शिवसेनेने व्हीप जारी केला.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप निश्चित झालेला नाही. ही निवडणूक घ्यावी, असा भाजपचा आग्रह आहे. हे पद रिक्त असल्याने घटनात्मकदृष्ट्या सरकार काम करत नसल्याची तक्रार भाजपने राज्यपालांकडे केली आहे.

याच निवडणुकीत घातपात होऊ शकतो, असा महाविकास आघाडीला संशय आहे. भाजपचे नेते या वर स्पष्टपणे बोलत नसले तरी संधी मिळाल्यास या निवडणुकीत महाविकास आघाडीत संकटात टाकू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

हे पद काॅंग्रेसकडेच राहणार असल्याचे स्पष्ट आहे. या पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा आहे. चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीचा विरोध होऊ शकतो. अजून तीनही पक्षांच्या समन्वय समितीत संभाव्य नावाची चर्चा व्हायची आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आदेश जारीआमदारव्हीपशिवसेना

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सगळे जण शेतातून पळत होते, अचानक मोठा आवाज झाला अन् सगळेच हादरले

February 24, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; नेमकं कारण काय?

February 22, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

खुर्ची तीच, फक्त नाव बदलले! ग्रामंपचायतींवर सरपंचांना प्रशासक बनवून सरकारने साधली ‘राजकीय सोय’

February 22, 2026
खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

भिगवण तरुणी अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणीचा रवानगी सुधारगृहात; आता तरुणाचं काय होणार? तरुणीचे धक्कादायक शपथपत्र

February 21, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! दहावीच्या परीक्षेत १० ‘मुन्नाभाई’; तरुणीसह २० जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; केंद्र संचालकांच्या सतर्कतेने मोठा रॅकेट उघड

February 21, 2026
Next Post
मंगळवेढेकरांनाे सावधान! आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा; प्रशासनाद्वारे सतर्कतेचे आदेश

नागरिकांनो! मंगळवेढ्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी तहसीलदार रावडेंनी नेमली भरारी पथके; 'या' नंबरवर करा संपर्क

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा