mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो! मंगळवेढ्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी तहसीलदार रावडेंनी नेमली भरारी पथके; ‘या’ नंबरवर करा संपर्क

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 30, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
मंगळवेढेकरांनाे सावधान! आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा; प्रशासनाद्वारे सतर्कतेचे आदेश

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील माण व भीमा नदीवरून होणाऱ्या वाळूच्या चोरीला व वाहतुकीला आळा बसवण्यासाठी तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी नायब तहसीलदार, तलाठी व कोतवाल यांचा समावेश असणारी सात भरारी पथके तयार केली आहेत.

त्यामुळे रात्रभर सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाला ब्रेक लागणार आहे. मंगळवेढा तालुक्यात माण व भीमा नदीतुन रात्री अवैध वाळू उपसा होत असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत.

तहसीलदार यांच्या परस्पर काही मंडळ अधिकारी व तलाठी , पोलीस यांनी वाळू चोराशी आर्थिक हातमिळवणी करीत वाळू चोरीचा उद्योग सुरू ठेवला होता. याबाबत तहसीलदार रावडे व प्रांताधिकारी यांच्याकडे महसूल मधील काहींच्या तक्रारी ही माण नदीकाठच्या नागरिकांनी केल्या आहेत मात्र ते अधिकारी अजून ठाण मांडून आहेत.

त्यामुळे वाळू उपशाला म्हणावासा ब्रेक लागला नव्हता. महसूल अधिकाऱ्यावर वाढते हल्ले व सध्या वाळू लिलाल नसतानाही रात्रीं चोरून होणाऱ्या वाळू उपसा रोखण्यासाठी शासनाने अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याकरता वेळोवेळी उपाययोजना केल्या आहेत.

तरीही गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याच्या काही घटना शासनाच्या निदर्शनास येत आहे. गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीच्या तक्रारीच्या पडताळणीसाठी आणि आकस्मिक तपासणीसाठी महसूली विभागनिहाय राज्यस्तरीय दक्षता व निरीक्षण पथक स्थापन करण्यात आहे आहे.

त्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तात्काळ जिल्ह्यातील तहसीलदार यांना एका पत्राद्वारे पथके नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तहसीलदार यांनी सात पथके स्थापन केली आहेत.

सदर पथक भीमा, माण नदी परिसर फिरणार आहे. या पथक प्रमुखाचा मोबाईल नंबर प्रसिद्ध केला आहे, नागरिकांनी वाळू चोरी बाबत या मोबाईल नंबर वर कॉल करून माहिती द्यावी त्याची दखल घेऊन दंडात्मक कारवाई, गुन्हे दाखल करून मालमत्ता जप्त केली जाईल असे पत्राद्वारे सूचित केले आहे.

वाळू चोरी रोखणे हे महसूल चे काम आहे असे समजून पोलीस विभानेही काही दिवस लक्ष देऊन पुन्हा याकडे दुर्लक्ष केले आहे तरी आता महसूल बरोबर पोलीस अधिकारी यांनाही या वाळू चोरी रोखण्याकामी महसूल विभागाला मदत करावी लागणार आहे.

या फिरत्या पथकाने वाळू चोरी रोखण्यास मदत होईल मात्र तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी माण व भीमा नदीकाठच्या मंडळ अधिकारी व तलाठ्यांची खांदेपालट केल्यास या मोहिमेला मोठे यश मिळेल अशा नदीकाठच्या नागरिकांतुन प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: तहसीलदार स्वप्नील रावडेमंगळवेढा

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026
हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
Next Post
सिध्देश्वर आवताडे यांच्या गावभेटी दौऱ्यास आजपासून सुरुवात

आरक्षणासाठी एक जुटीने लढा उभा करावा लागेल; तरच आपण ही लढाई जिंकू शकू : सिद्धेश्वर आवताडे

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 28, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा