टीम मंगळवेढा टाईम्स।
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज दि.१९ फेब्रुवारी रोजी जय भवानी-जय शिवाजी या घोषणांच्या निनादात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
मंगळवेढा शहरातून सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांच्या वतीने दि.१३ ते १८ फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढा शहरात कार्यक्रम घेण्यात आले व सायंकाळी 5 वाजल्यापासून शहरातील प्रमुख ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराजांची म्युझिकल बॅंड,
बेंजो,सुरसनई,हालगी पथक,मनोरंजन कार्टून,शोभेचे दरुकाम,घोडे नृत्य,ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला असून काढलेल्या मिरवणुकीमुळे वातावरण शिवमय झाले होते.
पारंपरिक वेशभूषेमध्ये शिवाजी महाराज, मावळ्यांचा सजीव देखावा मिरवणुकीमध्ये साकारण्यात आला होता.
या मिरवणुकीदरम्यान पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज