mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 30, 2020
in राजकारण, राज्य
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शिगेस पोहोचली आहे. प्रामुख्याने भाजपचे संग्राम देशमुख, अपक्ष उमेदवार नीता ढमाले, शरद पाटील व राष्ट्रवादीचे अरुण लाड यांच्यात काटे की टक्कर होत आहे.आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. यानिमित्ताने अनेकांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.

मंगळवारी (दि. 1 डिसेंबर) मतदान होत आहे. गुरुवारी (दि. 3) निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीसाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे.पूर्वी ही निवडणूक कधी होत होती हे सामान्यांना कळतही नव्हते. पण यावेळी सार्वत्रिक निवडणुकीसारखी चुरस निर्माण झाली आहे.

पदवीधरसाठी 62 तर शिक्षक मतदारसंघासाठी 35 उमेदवार मैदानात आहेत. ‘पदवीधर’मध्ये भाजपचे संग्राम देशमुख,अपक्ष उमेदवार नीता ढमाले,प्रा.शरद पाटील व राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड  यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे.

संग्राम देशमुख यांना पक्षाचा मोठा पाठिंबा मिळाला आहे तर नीता ढमाले यांना पदवीधर मतदारांचा व लाड यांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व मंत्री जयंत पाटील तसेच महाआघाडीतील काँग्रेस पाटील यांनी ताकद दिली आहे.

ही लढत चौरंगी होत असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

प्रचारासाठी नीता ढमाले या आघाडीवर आहेत. जाहीर सभा, कार्यकर्ता मेळाव्यांपासून ते मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी या नेत्यांची धावपळ सुरू आहे. नेत्यांच्या बैठका घेऊन प्रचाराच्या सूचना दिल्या जात आहेत. जादा मतदान असलेली गावे आणि शहरांवर विशेष नजर ठेवून कार्यकर्त्यांद्वारे मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रमुख व स्थानिक नेत्यांनीही प्रचाराच्या रणधुमाळीत सक्रिय सहभाग घेतल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

याचबरोबर जनता दलातर्फे माजी आमदार शरद पाटील, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, ‘आप’चे डॉ. अमोल पवार यांनीही जोरात प्रचार चालविला आहे.

अपक्ष उमेदवार नीता ढमाले यांनी प्रचाराचा धडाका उठवला आहे. सोशल मीडियावर तर प्रचाराचा धुरळा उडाला आहे. त्यामुळे आता कोण बाजी मारणार, याकडे सार्‍यांचेच लक्ष लागले आहे.

कोरोनामुळे मतदान केंद्रे केली कमी

यापूर्वी या मतदार संघात 1200 मतदारांसाठी एक मतदान केंद्र असायचे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 500 ते 700 मतदारांसाठी एक केंद्र तयार करण्यात आले आहे. त्यानुसार पदवीधर मतदारसंघात 589 मतदारांसाठी एक आणि शिक्षक मतदारसंघासाठी 258 मतदारांमागे एक मतदान केंद्र आहे.

विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये 1202 मतदान केंद्र आहेत. पदवीधर मतदारसंघामध्ये 835 आणि शिक्षक मतदारसंघात 367 मतदान केंद्र आहेत. मात्र केंद्रांची विभागणी करताना मतदारांना दूरवरची आणि दोन वेगवेगळी केंद्र आली आहेत. मतदान करताना सोशल डिटन्स व मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातील प्रमुख उमेदवार

संग्राम देशमुख (भाजप महायुती), नीता ढमाले(अपक्ष), अरुण लाड ( महाविकास आघाडी), प्रा.शरद पाटील (जनता दल),  श्रीमंत कोकाटे ( इतिहास संशोधक),

शिक्षकसाठी 35 उमेदवार रिंगणात

पुणे शिक्षक मतदारसंघात 35 जण रिंगणात आहेत. मावळते आमदार दत्तात्रय सावंत पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने जयंत आसगावकर, भाजपने जितेंद्र पवार आणि वंचित बहुजन आघाडीने सम्राट शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.

पदवीधर मतदारसंघातील मतदारसंख्या

1) पुणे : एक लाख 36 हजार 611, 2) कोल्हापूर: 89 हजार 529, 3) सांगली : 87 हजार 233, 4) सातारा : 59 हजार 71, 5) सोलापूर : 53 हजार 813, एकूण – चार लाख 26 हजार 257

शिक्षक मतदारसंघाचे जिल्हानिहाय मतदार

1) पुणे : 32 हजार 201, 2) सोलापूर: 13 हजार 584, 3) कोल्हापूर : 12 हजार 237 4) सातारा : सात हजार 711, 5) सांगली: सहा हजार 812, एकूण : 72 हजार 545

प्रश्‍नांपेक्षा राजकीय जुगलबंदीच अधिक

या निवडणुकीत विद्यार्थी, बेरोजगारी, शिक्षण, शिक्षक व त्यांचे प्रश्‍न यांची चर्चा होणे अपेक्षित होते. पण प्रचारात त्याचा कोठेही लवलेश दिसला नाही. उमेदवारांच्या जाहीरनाम्यातून त्यांचे सामान्य ज्ञान प्रकट होत आहे.

धोरणांवर प्रचार करण्यापेक्षा उमेदवारांची प्रतिमाहनन करण्यावर भर दिला जात आहे. एकमेकांची उणीदुणी काढण्याबरोबर राजकीय बदला घेण्याची भाषा वापरली गेली. प्रश्‍नांपेक्षा राजकीय जुगलबंदीच अधिक रंगली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पुणे पदवीधर मतदार संघ

संबंधित बातम्या

‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांनो! शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, ५ वर्ष शासनाचा कोणताही लाभ मिळणार नाही; नवा निर्णय काय?

March 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पुण्यातील मंगळवेढेकर बांधवांसाठी सुवर्णसंधी! आमदार समाधान आवताडे साधणार थेट ‘संवाद’; अडीअचणी जाणून घेण्यासाठी विशेष बैठक

March 28, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मोठी बातमी! बारामतीत अपघात, बंगळुरूत तक्रार; अजित पवार अपघात प्रकरणी दाखल झालेली झिरो FIR नेमकी आहे तरी काय?

March 27, 2026
अभिमानास्पद लढा! मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड ठरला महाराष्ट्र केसरीचा उपविजेता; मिळाली ‘ही’ बक्षिसे

महाराष्ट्र केसरी: महेंद्रची झुंज ठरली थरारक; मंगळवेढ्याचा ‘मान’ थोडक्यात हुकला; मैदानात काय घडलं?

March 23, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! इम्पोर्ट-एक्सपोर्ट व्यवसायाचे आमिष दाखवून शेतकऱ्याला १४ लाखांचा गंडा; पुण्यातील तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 24, 2026
ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

March 21, 2026
अशोक खरातची संगत भोवली, रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा निर्णय; चाकणकर यांनी पत्रात काय लिहिलं?

अशोक खरातची संगत भोवली, रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा निर्णय; चाकणकर यांनी पत्रात काय लिहिलं?

March 21, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

March 20, 2026
Next Post
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

आमदार भालकेंच्या निधनानंतर आरोग्याबाबतची समस्या ऐरणीवर, कोरोनामुक्तीनंतरही आरोग्याकडे दुर्लक्ष नकोच

ताज्या बातम्या

पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

March 29, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

March 29, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बंद दरवाजा उघडताच दिसला भाच्याचा मृतदेह; मंगळवेढ्यात एका दुर्दैवी घटनेने कुटुंबावर शोककळा

March 28, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांनो! शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, ५ वर्ष शासनाचा कोणताही लाभ मिळणार नाही; नवा निर्णय काय?

March 28, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! मंगळवेढ्यात अज्ञात दुचाकीच्या धडकेत ३ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; घटनेने परिसरात हळहळ; पालकांनो मुलांची काळजी घ्या

March 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा