mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शरद पवारांना मोठा धक्का! सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीतील ‘या’ आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 19, 2025
in राजकारण, राज्य
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाला एकामागे एका धक्के बसत आहेत.

एका बाजूला ठाकरे सेनेचे माजी आमदार नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे मोठ्या संख्येने शिंदेसेनेत इनकमिंग सुरू असताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विद्यमान आमदाराने लावलेल्या बॅनरवरून शरद पवार आणि त्यांची तुतारी गायब झाली आहे.

या बॅनरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचे फोटो झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मोहोळचे आमदार राजू खरे यांनी शिवजयंतीनिमित्त शिंदे सेनेचे भरत गोगावले यांना कार्यक्रमाला बोलावले आहे.

यानिमित्त ठिकठिकाणी लागलेल्या डिजिटल आणि फ्लेक्स वरून शरद पवार आणि त्यांची तुतारी गायब होऊन त्या जागी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत शेठ गोगावले यांचे फोटो झळकले आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का

मोहोळचे आमदार राजू खरे हे शरद पवार गटाचे आमदार असले तरी त्यांनी जाहीररित्या यापूर्वीही मी तुतारीवाला नसून कट्टर शिवसैनिक असल्याचे वक्तव्य भाषणातून केले होते. आता थेट त्यांच्या फ्लेक्स आणि बॅनरवरून शरद पवार आणि त्यांच्या पक्षाची तुतारी गायब होऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री भरत गोगावले यांचे फोटो मोहोळ आणि पंढरपूर भागात लागले आहेत.

एका बाजूला ठाकरे सेनेचे माजी आमदार नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे मोठ्या संख्येने शिंदेसेनेत इनकमिंग सुरू असताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विद्यमान आमदारानेच अशा पद्धतीचे फलक लावत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला आहे.

राजू खरेंच्या मनात चाललंय तरी काय?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार राजू खरे यांनी चुकून मला तुतारी हाती घ्यावी लागली. मी तुमच्यासोबत 35 वर्षे होतो, असे वक्तव्य केले होते. यावेळी महाविकास आघाडीचे धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी समोर पत्रकार आहेत, असे लक्षात आणून दिले होते.

यानंतर आमदार खरे आपल्या विधानावर ठाम राहत पुढे पत्रकार असेल तरी असू द्या, असे विधान त्यांनी केले होते. आता राजू खरे यांच्या बॅनरवरून शरद पवारांना वगळल्याने राजू खरे यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: राष्ट्रवादी शरद पवार गट

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सगळे जण शेतातून पळत होते, अचानक मोठा आवाज झाला अन् सगळेच हादरले

February 24, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; नेमकं कारण काय?

February 22, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

खुर्ची तीच, फक्त नाव बदलले! ग्रामंपचायतींवर सरपंचांना प्रशासक बनवून सरकारने साधली ‘राजकीय सोय’

February 22, 2026
खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

भिगवण तरुणी अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणीचा रवानगी सुधारगृहात; आता तरुणाचं काय होणार? तरुणीचे धक्कादायक शपथपत्र

February 21, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! दहावीच्या परीक्षेत १० ‘मुन्नाभाई’; तरुणीसह २० जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; केंद्र संचालकांच्या सतर्कतेने मोठा रॅकेट उघड

February 21, 2026
Next Post
मंगळवेढा शिक्षक तालुका पतसंस्थेचे चेअरमन नंदिनी विलास मासाळ-टेळे यांना पितृशोक

मंगळवेढा शिक्षक तालुका पतसंस्थेचे चेअरमन नंदिनी विलास मासाळ-टेळे यांना पितृशोक

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

February 28, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा