टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा पोलिस ठाण्याकडे नव्याने सात पोलिस कर्मचारी आले असून येथील सहा पोलिसांच्या अन्यत्र बदल्या झाल्या आहेत.
दरम्यान, काही नव्याने पोलिस येण्याच्या प्रतिक्षेत आहेत. सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते यांनी पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
मंगळवेढा पोलिस ठाण्याकडे नव्याने आलेले पोलिस कर्मचारी व कंसामध्ये ठिकाण पुढीलप्रमाणे –
सहाय्यक फौजदार सलीम शेख ( मुख्यालय ) , पोलिस नाईक शिवाजी पांढरे ( अकलूज ) , गणेश पवार ( पंढरपूर शहर ) , विलास काळे ( पंढरपूर तालुका ) , सुनिल चंदनशिवे ( कुडूवाडी ) , हजरत पठाण ( सांगोला ) , विठ्ठल विभुते ( पंढरपूर ग्रामीण ) आदी कर्मचारी पोलिस ठाण्याकडे आले आहेत.
दरम्यान , अन्य काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या येथे झाल्याचे वृत्त असून ते अदयाप हजर झाले नाहीत.मंगळवेढा येथून अन्यत्र सहा पोलिस कर्मचारी बदलून गेले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज