टीम मंगळवेढा टाईम्स ।
शि प्र मंडळ संस्थेच्या सचिवा डॉ.प्रियदर्शनी महाडिक यांनी हाती घेतलेले हे अभियान पोषक पर्यावरणाचे मोठे द्योतक आहे संतभूमी म्हणून परिचय असलेल्या मंगळवेढा भूमीला वृक्षभूमी असा लौकिक मिळून ओळखली जाईल असे प्रतिपादन आ समाधान आवताडे यांनी केले
ते शुक्रवारी वटपौर्णिमा व योगदीन याचे औचित्य साधून शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या वृक्ष महोत्सव-२०२४ अंतर्गत दहा हजार झाडांचे वृक्षारोपण या पर्यावरण पूरक कार्याचा शुभारंभ करताना बोलत होते.
यावेळी सिनेअभिनेते शंतनु मोघे अजय तपकिरे अध्यक्ष ऍड.सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ सुभाष कदम ,डॉ मीनाताई कदम,डॉ प्रियदर्शनी महाडिक, प्रा तेजस्विनी कदम,शिवाजीराव काळुंगे, उद्योजक पवन महाडिक, सरपंच शिवाजी सरगर, श्रीधर भोसले यतीराज वाकळे, रवींद्र काशीद यांच्या उपस्थितीत आ.समाधान आवताडे यांच्या हस्ते संत चोखामेळानगर येथील कृष्ण तलाव परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना आ.आवताडे यांनी हे अभियान लोक जागृतीच्या माध्यमातून गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण करून जास्तीत-जास्त झाडांची निर्मिती करूया तालुक्यात 45 हजार विद्यार्थी आहे प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप देणार असून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट साध्य करून जिल्ह्यात तालुका वृक्ष लागवडी मध्ये अग्रेसर ठेवूया असे आवाहन उपस्थिताना केले.
या वृक्ष लागवड मोहिमेच्या संकल्पक डॉ प्रियदर्शनी महाडिक यांनी आपले विचार मांडताना महाराष्ट्रात तापमान वाढ होत असून सोलापूर जिल्हा 45 सेल्सिअच्या पुढे गेला आहे श्रीमंतांना एअर कंडिशन ची सुविधा आहे.
मात्र गोरगरीब लोकांना झाडांचा आधार आहे यासाठी निसर्गामध्ये वृक्षारोपणाची संकल्पना पूर्ण करण्याचे ठरवले येत्या वर्षभरात या ठिकाणी शासनाच्या आहेत त्या ठिकाणी पारंपारिक वृक्षारोपण करण्याची तुमची तयारी असून चिंच पिंपळ वड लिंब करंजी या झाडाचे मानवी आरोग्याला मोठे फायदे आहेत.
भविष्यात यापासून उत्पादन निर्मिती होऊ शकते आपल्या मनगळवेढ्याची ज्वारी जीआय मानांकनामध्ये असून अन्नप्रक्रिया उद्योगांमधून मंगळवेढ्याच्या ज्वारीला येणाऱ्या काळात चांगले दिवस येतील असा आशावाद यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केला.
या कार्यक्रमास तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी.योगेश कदम,शिवसेना शहरप्रमुख दत्तात्रय भोसले,संपादक.दिगंबर भगरे,वारी परिवाराचे संस्थापक.सतीश दत्तू ,प्रफुल सोमदळे,ऍड प्रकाश घुले,
शाम पवार, कैलास कोळी आनंद मुढे माऊली कोंडूभैरी,सुरेश मेटकरी आदी मान्यवर तसेच प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी व स्थानिक नागरिक, पर्यावरण प्रेमी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृक्षदिंडीने वेधले लक्ष
इंग्लिश स्कूल मंगळवेढा या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी बनवून वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये ही दिंडी शहरातून चोखामेळा नगर येथील कृष्णा तलावाकडे मार्गस्थ झाली ही दिंडी इतकी आकर्षित होती की शहरातील सगळ्यांचे लक्ष या दिंडीने वेधले होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज