टीम मंगळवेढा टाईम्स ।
प्रहार जनशक्ती पक्षाच्या मंगळवेढा तालुका उपाध्यक्षपदी संजय राठोड यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मंगळवेढा तालुका प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार शेतकरी संघटना, प्रहार अपंग संघटना, प्रहार धरणग्रस्त संघटना यांची आज मंगळवेढा येथे विश्रामगृह या ठिकाणी बैठक झाली
या बैठकीत छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चा विषयी सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ता मस्के पाटील यांनी आढावा घेतला.
या बैठकीत धरणग्रस्त चे जिल्हाध्यक्ष रणजीत जगताप ,पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष मोरे ,सांगोला तालुकाध्यक्ष अजय हिप्परकर, राहुल गाडे, संजय देवकते ,संजय वलेकर ,बाळासो काळे पाटील ,गणेश कांबळे, जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील ,संतोष पवार ,
राकेश पाटील, सिद्धराया माळी, राजू स्वामी ,राजू सावंत ,अजय राठोड ,युवराज टेकाळे, आशिष पवार, शकील खाटीक, सविता सुरवसे , विजय तेली ,आकाश सूर्यवंशी,
बापू घोडके ,अंकुश सकट ,संतोष यादव , अनिल दोडमिसे व इतर प्रहार सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील यांनी सगळ्यांना मार्गदर्शन केले व मंगळवेढा तालुक्यातील संजय राठोड व अक्षय सूर्यवंशी यांचे सामाजिक काम पाहुन त्यांच्या नियुक्तीचे पत्र दिले या बैठकीचे प्रास्ताविक प्रहारचे समाधान हेंबाडे यांनी केले तर सूत्रसंचालन धनंजय माने तर आभार संजय राठोड यांनी मानले.
संजय राठोड बोलताना म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी मी सदैव तत्पर राहणार आहे. येणाऱ्या काळात शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज