mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सांगोला : रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर व डॉक्टरची सुविधा पुरवावी : नगरसेवक सतीश सावंत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सांगोला : रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर व डॉक्टरची सुविधा पुरवावी : नगरसेवक सतीश सावंत

बाळासाहेब झिंजुरटे । सांगोला नगरपालिकेकडे असणारी  रुग्णवाहिका हि सुसज्य नसून या रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर व डॉक्टर The ambulance is not equipped with a ventilator and a doctor यांची सुविधा उपलब्ध नसल्याने अति गंभीर रुग्णांसाठी नागरपालिकेची रुग्णवाहिका बोलाविणे हे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे सांगोला  शहरातील आजारी पडणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता नगरपालिकेने रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर व डॉक्टर यांची सुविधा पुरवावी. तसेच शहरातील मिरज रोड व महूद रोड परिसरातील एखादा नागरिक  मृत पावल्यावर लोकांची व प्रेताची होत असलेली असुविधा लक्षात घेता नगरपालिकेने स्वतःची शववाहिका खरेदी करावी या दोन महत्वपूर्ण मागण्यांसाठी सांगोला नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सतीश सावंत Corporator Satish Sawant यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. Sangola Municipal ambulance should be provided with ventilator and doctor’s facility

सद्यस्थितीत कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रभर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्याने सोलापूर जिल्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी देखील रोज चढता क्रम घेत आहे. सध्या सांगोला शहर जरी कोरोनमुक्त असले तरी  शहरातील नागरिकांचा इतर तालुका व जिल्ह्यांशी संपर्क हा होतच असतो. विविध वस्तू व अन्नधान्यांच्या माल गाड्या असोत अथवा डाळिंब व्यवसाय असो सांगोला शहरातील नागरिकांचा  इतर नागरिकांशी  संपर्क होत असल्याने सांगोला नगरपालिकेने देखील कोरोनासंदर्भात उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

सांगोला नगरपालिकेकडे स्वतःची  रुग्णवाहिका गाडी आहे परंतु या गाडीमध्ये सुसज्य अशी सुविधा उपलब्ध नसल्याने या रुग्णवाहिकामध्ये अति गंभीर रुग्णांसाठी वेंटिलेटरची सुविधा नाही. तसेच रुग्णवाहिकेमध्ये कायमस्वरूपी डॉक्टरांची देखील नेमणूक केलेली नसल्याने अतिशय गंभीर रुग्ण रुग्णवाहिकेमधील सुविधे अभावी दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सांगोला शहरातील मिरज रोड व महूद रोड या परिसरातील एखादी  व्यक्ती जर मृत झाली तर सदरचे प्रेत नगरपालिकेच्या वाढेगाव नाका येथील स्मशानभूमीमध्ये घेऊन येणे हे संबंधित नागरिकांसाठी मोठे त्रासदायक ठरत आहे.

त्यामुळे मृत नागरिकांना वाहून नेण्यासाठी सांगोला नगरपालिकेने शववाहिका खरेदीसाठी  सर्वसाधारण सभेत ठराव करून तब्ब्ल 2 वर्षे उलटली तरीही अद्याप कोणतीही कार्यवाही कली जात नाही. सांगोला नगरपालिका महाराष्ट्रात सर्वात मोठी ‘क’ वर्ग नगरपालिका आहे. सर्वात मोठे 68.2 चौ.कि.मी. नगरपालिकेचे क्षेत्रफळ आहे. शहरात एखतपूर रोड, मिरज रोड, वासुद रोड, कडलास रोड, महुद रोड, चिंचोली रोड, पंढरपूर रोड, येथे एखादी व्यक्ती मयत झाल्यावर त्याला स्मशानभूमीत आणण्यासाठी त्या-त्या भागात स्मशानभूमी नसल्याने खूप त्रास होत आहे. त्यामुळे शववाहिका खरेदी करणे गरजेचे आहे.

सदरची गरज लक्षात घेऊन नगरसेवक सतीश सावंत यांनी शववाहिका व अ‍ॅम्ब्युलन्सला व्हेंटीलेटर बसविण्याबाबत ठराव मंजूर असूनही प्रत्यक्षात अमलात येत नसल्याने वारंवार पठापुराव केला असता प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी  व  सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ व्हेंटिलेटर बसवून रुग्णवाहिकेमध्ये कायमस्वरूपी डॉक्टरची नेमणूक करावी जेणेकरून नागरपालिकेची रुग्णवाहिका ही जीवघेणी न ठरता जीवनदायी ठरावी. तसेच मृतदेह वाहून नेण्यासाठी शववाहिका खरेदी करावी या दोन महत्वपूर्ण मागण्या लेखी निवेदनाद्वारे केल्या आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: SamajikSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
TikTok सह ‘या’ 52 चिनी ॲप भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक ; जाणून घ्या त्यांची नाव

TikTok सह 'या' 52 चिनी ॲप भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक ; जाणून घ्या त्यांची नाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 26, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

​ग्रामस्थांनो, हेलपाटे मारायचे बंद! आता थेट सोलापूर जिल्हा परिषदेच्या CEO च्या व्हॉट्स ॲपवर पाठवा अर्ज; तक्रार निवारणासाठी हेल्पलाइन नंबर केला जारी

May 26, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राष्ट्रीय कर्तव्य बजावताना आदर्श शिक्षकाचा उन्हाच्या तडाख्याने दुर्दैवी मृत्यू; शिक्षण क्षेत्र हादरले

May 26, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

सोलापूर विधानपरिषद निवडणूक: उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम; कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली; मुंबईत लॉबिंग सुरू; परीचारकांचे नाव आघाडीवर पण…

May 26, 2026
मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा

मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा

May 26, 2026
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियम-अटी जाहीर; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

May 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा