टीम मंगळवेढा टाईम्स । भारत-चीन लडाख सीमा वाद चांगलाच पेटला आहे. त्यामुळे भारताची सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या टिकटॉकसह ५० चिनी ॲपचा वापर न करण्याचा इशारा भारत सरकार आणि भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. चीनचे हे ५० ऍप्स भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले.
या ऍपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे असंही यंत्रणांनी म्हटलं आहे. यामध्ये Tik-Tok, Helo, UC Browser आणि Zoom अशा ॲप्सचा समावेश आहे. 52 Chinese app with TikTok is a threat to India’s security शिवाय चीनमधील शॉपिंग ॲप Shien आणि Xiaomi देखील सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे.
यासंबंधीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे. Tik-Tok, Helo, UC Browser या ॲप्सचा युझर्स आपल्या मनोरंजनासाठी वापर करतात. परंतु हे सर्व ॲप्स तुमच्या फोनची लोकेशन आणि महत्त्वाची माहिती हस्तगत करते. शिवाय ॲप्सच्या माध्यमातून हस्तगत केलेली सर्व माहिती चिनी कंपन्यांनी चीन सरकारला पुरवणे बंधनकारक असते.
या माहितीच्या सहाय्याने चिनी गुप्तचर यंत्रणा आणि चिनी सैन्य देशावर हल्ला करण्याची रणनीती आखू शकते अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. पाश्चिमात्य देशांमधील सुरक्षा यंत्रणांनाही अनेकदा चिनी कंपनीच्या मालकीच्या ॲप्सच्या वापरासंदर्भातील धोका आणि उघडपणे बोलून दाखवला आहे.
ही चिनी ॲप्स तुमच्या फोनमध्ये आहेत का?
- TikTok
- Vault-Hide
- Vigo Video
- Bigo Live
- SHAREit
- UC News
- UC Browser
- BeautyPlus
- Xender
- ClubFactory
- Helo
- LIKE
- Kwai
- ROMWE
- SHEIN
- Zoom
- NewsDog
- Photo Wonder
- APUS Browser
- VivaVideo- QU Video Inc
- Perfect Corp
- CM Browser
- Virus Cleaner (Hi Security Lab)
- Mi Community
- DU recorder
- YouCam Makeup
- Mi Store
- 360 Security
- DU Battery Saver
- DU Browser
- DU Cleaner
- DU Privacy
- Clean Master – Cheetah
- CacheClear DU apps studio
- Baidu Translate
- Baidu Map
- Wonder Camera
- ES File Explorer
- QQ International
- QQ Launcher
- QQ Security Centre
- QQ Player
- QQ Music
- QQ Mail
- QQ NewsFeed
- SelfieCity
- Clash of Kings
- Mail Master
- Mi Video call-Xiaomi
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज