टीम मंगळवेढा टाईम्स।
रतनचंद शहा बँकेस गहाणखत करून दिलेल्या जमिनीची परस्पर विक्री केल्याप्रकरणी कर्जदार, जामीनदार, खरेदीदार, साक्षीदार, सरपंच, शिक्षक, शिक्षिका एजंटासह १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाची फिर्याद रतनचंद शहा बँकेचे वसुली अधिकारी अंकुश गंगाधर जाधव रा.नागणेवाडी यांनी दिली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगासागर बसवेश्वर पाटील व त्याचा मृत भाऊ शैलेश बसवेश्वर पाटील यांनी बँकेकडून २०११ साली तीन लाख रुपये कर्ज घेतले.
त्यासाठी जमीन गट नंबर ७/२ क्षेत्र ८ हेक्टर १३.१० आर. इतकी जमीन गहाण ठेवण्यात आली. ती नोंद कायम ठेवून २०१४ रोजी ६ लाख रुपये टर्म लोन घेतले. त्यानंतर काही नोंदी कायम ठेवून आणखीन वाढीव रकमेची कर्जे घेतली. त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली.
या कर्जाला शशिकांत मोतीलाल नाझरकर व पांडुरंग शिवाजी पडवळे हे जामीनदार आहेत. कर्जदाराने बँकेस अंधारात ठेवून तारण जमिनीतील काही जमीन संजय नाना बिचुकले रा. हाजापूर यांनी विक्री केली.
या खरेदीस धनाजी नाना बिचुकले रा.हजापूर व सिद्धेश्वर कदम रा.गणेशवाडी हे साक्षीदार आहेत. बँकेकडे जमीन तारण असताना ती खरेदी केली.
जमीन तारणाची नोंद असताना साक्षीदार म्हणून सही केली. त्यानंतर ती जमीन विजया शिवाजी पाटील रा.खोमनाळ यांनी १.६१ आर. खरेदी केली. त्याचे साक्षीदार म्हणून सुरूज चंदू सुतार रा . खोमनाळ हे आहेत.
याशिवाय शैलेश बसवेश्वर पाटील यांच्याकडून शिवाजी निवृत्ती पाटील खोमनाळ यांनी ८४.०५ आर.जमीन खरेदी केली. साक्षीदार म्हणून सलीम युनूस इनामदार रा.नर्मदा पार्क , रोहित रंगनाथ इंगळे रा.खोमनाळ हे आहेत.
त्यानंतर यांनीच ०.४१ आर.अशी एकूण १.२५ आर . इतकी जमीन खरेदी केली. या जमिनीवर बँकेचा बोजा माहित असताना देखील भीमराव दगडू शिंदे रा.खोमनाळ, ईश्वर कुंडलिक शिंदे रा.डोंगरगाव यांनी बेकायदेशीररित्या कागदपत्रे करून जमीन खरेदी विक्री करण्यास मदत केली.
जमिनीच्या विक्रीनंतर आलेले पैसे बँक खात्यात भरले नाहीत. त्यामुळे कर्जदाराकडे १३ लाख ३० हजार ६ ९ ६ रुपये इतकी रक्कम राहिली.
म्हणून बँकेचे फिर्यादी अंकुश जाधव यांनी कर्जदार गंगासागर बसवेश्वर पाटील व मृत शैलेश बसवेश्वर पाटील दोघे रा.भाळवणी, धनाजी नाना बिचुकले व संजय नाना बिचुकले रा.हजापूर, सिद्धेश्वर कदम रा.गणेशवाडी,
शिवाजी निवृत्ती पाटील, विजया शिवाजी पाटील, भीमराव दगडू शिंदे, सूरज चंदू सुतार, रोहित रंगनाथ इंगळे सर्वजण रा.खोमनाळ,
सलीम युनूस इनामदार रा.नर्मदा पार्क , ईश्वर कुंडलिक शिंदे, रा.डोंगरगाव अशा १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसाहेब पिंगळे हे करीत आहेत.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज