टीम मंगळवेढा टाईम्स।
गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी सई फाउंडेशन उभे राहणार असल्याचे प्रतिपादन सई फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी सभापती तानाजी काकडे यांनी केले आहे.
सई फाउंडेशन भोसे यांचे तर्फे गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
भोसे येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सई फाउंडेशन या संस्थेतर्फे मंथन राज्यस्थरिय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला.
तानाजी काकडे पुढे बोलताना म्हणाले की, या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास केला पाहिजे. आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विषयांची सखोल माहिती आत्मसात करून घेणे गरजेचे आहे. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षक यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सत्कार समारंभावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सई फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य, सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले व मार्गदर्शक शिक्षकांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
मुख्याध्यापक गुरुदेव स्वामी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी अश्या परीक्षेमध्ये सहभाग घेतला पाहिजे त्याशिवाय वेगवेगळ्या परीक्षेमध्ये यश मिळणार नाही.
या कार्यक्रमासाठी भोसे गावचे सरपंच सुरेश ढोणे, उपसरपंच बाळू काकडे, ग्रा.सदस्य सचिन नागणे, पत्रकार सचिन तटाळे, पत्रकार गुरुदेव स्वामी, युवा नेते प्रकाश कोळी, मॉडर्न स्कूलचे माने सर, अनिता माने मॅडम, अवंती पाटील आदीजन उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज