mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आमदार साहेब! सुनावणीला प्रांताधिकारी सातत्याने गैरहजर; शेतकर्‍यांना दिली जातेय तारिख पे..तारीख; शेतकरी व नागरिकांतून होतोय संताप व्यक्त

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 27, 2023
in मंगळवेढा
शेतकऱ्यांनो! लाचखोर सुरज नळे व संबंधितांनी पैसे व कोरे चेक घेतले असल्यास त्यांनी थेट लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा; अधिकाऱ्यांचे आवाहन

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क।

मंगळवेढ्याचे महान संत दामाजीपंताने दुष्काळाच्या काळात ज्वारीचे कोठार खुले करून गोरगरिबांना जगवले होते, परंतु मंगळवेढ्यात संबंधित कर्मचारी, अधिकारी मात्र गोरगरिबांचे लुटून स्वतःची तुंबडी भरण्याचा उद्योग करत असल्याचा आरोप सर्वसामान्य जनता करत आहे.

याप्रकरणी आमदार समाधान आवताडे यांनी लक्ष घालून शेतकरी व सर्वसामान्य जनतेची होणारी अडवणूक दूर करावी अशी मागणी देखील आता पुढे येऊ लागली आहे.

मंगळवेढा प्रांत कार्यालयातील लाच प्रकरणाच्या घटनेस जवळपास 30 दिवस उलटत आले असतानाही प्रांताधिकारी कार्यालयाकडे फिरकत नसल्याने कार्यालय अधिकार्‍यांविना निराधार बनले असल्याच्या भावना नागरिक व शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत.

दरम्यान, येथील प्रांताधिकारी तब्बल 26 दिवस उलटूनही कार्यालयाकडे फिरकले  नसल्यामुळे सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना सुनावणीच्या तारखा, तारीख पे…. तारिख मिळत असल्याने शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त होत आहे.

सांगोला तालुक्यातील एका शेतकर्‍याचे राष्ट्रीय महामार्गातील पाईपलाईनचे रक्कम काढून देण्यासाठी येथील तलाठी व एक झिरो कर्मचारी यांच्यावर लाचेचा गुन्हा दाखल दि.29 मार्च रात्री झाला होता.

तेव्हापासून येथील प्रांताधिकारी कार्यालयाकडे फिरकलेच नसल्याच्या तक्रारी शेतकरी व नागरिकांच्या आहेत. परिणामी अधिकार्‍याविना हे कार्यालय पोरके झाले असल्याच्या भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत.

चालू महिन्यातील चार मंगळवार प्रांताधिकारी तारखेला गैर हजर असल्यामुळे सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील आलेल्या शेतकर्‍यांना केवळ पुढील तारखा देवूनच माघारी पाठविण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

दि.25 एप्रिल मंगळवार रोजी स्थावर मालमत्ता 34 केसेस, आर.टी.एस.आर. 42 केसेस, हद्दपारी 3 केसेस, नागरिक पेन्शन व रस्ता 10 केसेस अशा एकूण 89 केसाची सुनावणी ठेवली होती.

मात्र प्रांताधिकारी सुनावणीला गैरहजर राहिल्याने गेल्या चार मंगळवारी या सुनावणी होवू शकल्या नाहीत. 35 कि.मी. अंतरावरून सांगोल्यातील शेतकरी व मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी नागरिक या तारखांना भर उन्हात हजर होते.

मात्र अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांनी कामकाजावर नाराजी व्यक्त करीत आल्या पावलांनी पुढील तारीख घेवून माघारी जावे लागले.

दरम्यान बुधवार 26 रोजी कार्यालयाकडे अधिक चौकशी केली असता अकरा वाजता प्रांत अधिकारी कार्यालयात आले व साडेअकरा वाजता फोंजा पोचवून निघून गेल्याचे सांगण्यात आले.

लाच प्रकरण घडल्यापासून येथील अधिकार्‍याची काम करण्याची मानसिकता नसल्याची नागरिकांमधून चर्चा असून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी येथे नव्याने अधिकारी नेमून नागरिकांचे रेंगाळली कामे मार्गी लावावी अशी मागणी होत आहे.

दरम्यान लाच प्रकरणाचे महाभारत ज्याच्यामुळे घडले तो अधिकारी काही अधिकार्‍याच्या आशीर्वादामुळे अद्यापही बाहेर फिरत आहे. आरोपी नळे अदयापही तोंड उघडत नसल्याचे कारण पुढे करून हे प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न होत आहे.

परिणामी तपास व्यवस्थित होत नसल्याचा संशय व्यक्त केला जात असून लाचलुचपत पुणे विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या कामी लक्ष घालून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन ज्यांच्यामुळे महसूल विभाग बदनाम झाला त्या अधिकार्‍याची चौकशी  करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

त्या अधिकार्‍याने शेतकरी वर्गाला महामार्गाच्या मोबदल्यासाठी छळ करून आपले खिसे भरले आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी देखील या घटनेचे गांभीर्य ओळखून सदर प्रकरणाची चौकशी लावणे अपेक्षित असताना त्यांनी केवळ बदली करून जावा असा सोज्वळ सल्ला दिल्याने शेतकरी वर्ग संतापला आहे.

दामाजीपंताने दुष्काळाच्या काळात ज्वारीचे कोठार खुले करून गोरगरिबांना जगवले होते परंतु या अधिकार्‍याने मात्र गोरगरिबांचे लुटून स्वतःची तुंबडी भरण्याचा उद्योग केला आहे.

येथे नेमणुकीस असलेला तलाठी सुरज नळेला प्रांताधिकार्‍यांनी केवळ रस्त्याच्या टक्केवारीच्या वसुलीसाठी दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी तहसील कार्यालयाकडे बदलीचा आदेश केला.

तसेच दिनांक 27 डिसेंबर 21 रोजी तेथून कार्यमुक्त करून प्रांत कार्यालयात रुजू करून घेतले.अरळी येथे तहसीलदार यांनी 27 जून 2019 रोजी नेमणूक केली होती अरळी सजेतील तलाठ्याची जागा अद्यापही रिक्त असून या जागेवर अतिरिक्त म्हणून बी.बी. गायकवाड यांच्याकडे कार्यभार दिला आहे.

दरम्यान येथील शेतकर्‍यांची गैरसोय निर्माण करून प्रांताधिकारी यांनी आपल्या सोयीसाठी बदलीचा आदेश केल्याने येथील प्रांताचा मनमानी कारभार उघड झाला आहे.

टक्केवारी रक्कम न दिल्याने मंजूर रक्कम अदयापपर्यत दिलेली नाही

सांगोला येथील गट नं.275 मधील 5 ब/2 हा प्लॉट महामार्गात गेला आहे.याची मंजूर रक्कम 6 लाख रूपये  मिळण्यासाठी मी प्रांताधिकार्‍यांकडे सातत्याने भेटूनही  टक्केवारी रक्कम न दिल्याने मंजूर रक्कम अदयापपर्यत दिलेली नाही. माझे वय 67 असल्याने प्रांताधिकारी कार्यालकडे चकरा मारून मी  त्रस्त झालो आहे. -दयानंद स्वामी,सेवानिवृत्त फौजदार,सांगोला

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नियतीचा क्रूर डाव! बाळ जन्माला आलं, पण माऊलीने जगाचा निरोप घेतला; मंगळवेढा येथील धक्कादायक घटना

July 20, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 21, 2026
अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

July 20, 2026
मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी

पिके करपली, पशुधन संकटात! मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंतांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव

July 19, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

खळबळ! ऊसतोड मजूर, बालविवाह अन् दोन अपत्ये… मंगळवेढ्यातील ‘त्या’ धक्कादायक प्रकाराने पोलीसही चक्रावले

July 19, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात सुन्न करणारी घटना! ११ वर्षांच्या चिमुरडीने शेतात जाऊन संपवलं जीवन; कारण…

July 18, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न प्रकरणातून आरोपीची मुक्तता; मंगळवेढ्यात ॲड.ओंकार भुसे यांच्या न्यायालयीन कौशल्याची चर्चा

July 14, 2026
Next Post
जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देणार; मंगळवेढयाचे नवनियुक्त तहसीलदार मदन जाधव यांनी स्विकारला कार्यभार; त्यांच्यापुढे असणार  ‘हे’ आव्हाने

जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देणार; मंगळवेढयाचे नवनियुक्त तहसीलदार मदन जाधव यांनी स्विकारला कार्यभार; त्यांच्यापुढे असणार  'हे' आव्हाने

ताज्या बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पतीच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय आईने १० महिन्यांच्या चिमुरडीला संपवले; सोलापूर जिल्ह्यातील घटना

July 21, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

देवस्थान लुटलं! ‘या’ मंदिरात तब्बल 60 कोटींचा महाघोटाळा; तपासासाठी आलेल्या महिला ऑफिसरने मारला डल्ला

July 21, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नियतीचा क्रूर डाव! बाळ जन्माला आलं, पण माऊलीने जगाचा निरोप घेतला; मंगळवेढा येथील धक्कादायक घटना

July 20, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 21, 2026
अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

July 20, 2026
मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी

पिके करपली, पशुधन संकटात! मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंतांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव

July 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा