mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा ग्रामीणसाठी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी काढले सुधारित आदेश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 12, 2021
in सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! ग्रामपंचायत मतदानादिवशी आठवडी बाजार राहणार बंद

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तसेच राज्यात डेल्टा, डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले होते.

त्यामुळे राज्य सरकारे हटविलेले निबंध पुन्हा राज्यात लावण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने राज्यातील सर्व शहरे व जिल्ह्यांचा समावेश स्तर ३ मध्ये केला होता. स्तर ३ चे निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला होता.

सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची दि.९ जुलै रोजी बैठक आयोजित करणेत आलेली होती.

सदर बैठकीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ( ग्रामीण क्षेत्र ) कोव्हीड बाधीत रुग्णांचा दि.८ जुलै रोजीचा पॉझिटीव्हीटी रेट हा ५.३३ % असून ऑक्सिजन बेडस व्यापलेली टक्केवारी ९ .१५ % असल्याने महाराष्ट्र शासनाकडील दि . ०४.०६.२०२१ व दि . २५.६.२०२१ अन्वये देण्यात आलेल्या निर्देशाप्रमाणे सोलापूर जिल्हा निर्बंध स्तर -३ मध्ये अंतर्भूत होत आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये सर्वानुमते शासनाच्या निर्देशाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यासाठी स्तर -३ चे दि. ०७.०६.२०२१ पासून लागू केलेल्या निबंधांना पुढील आदेश होईपर्यंत मुदतवाढ देणेबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोलापूर महानगरपालिका प्रशासकीय क्षेत्र वगळून , सोलापूर जिल्हा ग्रामीण क्षेत्र वेगळा प्रशासकीय घटक मानण्यात येत आहे. यानुसार सोलापूर जिल्हा ( ग्रामीण क्षेत्र ) मधील कोव्हीड -१ ९ चा दि . ०८.०७.२०२१ रोजीचा पॉझिटीव्हीटी दर ५.३३ % असून वापरण्यात आलेले ऑक्सिजन बेड ची टक्केवारी दर हा ९ .१५ % आहे.

राज्य शासनाने निश्चित केलेल्या एकूण पाच स्तरांपैकी सोलापूर जिल्हा ( सोलापूर महानगरपालिका प्रशासकीय क्षेत्र वगळून ) हा प्रशासकीय घटक तीसऱ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे.

राज्य शासनाने निश्चित केलेल्या एकूण पाच स्तरांपैकी सोलापूर जिल्हा ( सोलापूर महानगरपालिका प्रशासकीय क्षेत्र वगळून ) हा प्रशासकीय घटक तीसऱ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे.

त्यामुळे सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १ ९ ७३ चे कलम १४४ ( १ ) ( ३ ) अन्वये सोलापूर जिल्ह्यात ( पोलीस आयुक्तालय सोलापूरची हद्द वगळून ) सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना ( कोविड -१ ९ ) विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी दि. ०५.०६.२०२१ अन्वये देण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास पुढील आदेश होईपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती / संस्था अथवा संघटना यांचेवर भारतीय दंड संहिता ( ४५ जिल्ह्यासाठी ऑफ १८६० ) कलम १८८ मधील तरतूदीनुसार लागू दंडनिय कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ , साथ रोग

नियंत्रण कायद्यातील तरतूदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करणेत येईल , अशा व्यक्ती , संस्था अथवा संघटना यांचे विरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी कारवाई करावी असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे .

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना आढावाजिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरसोलापूर जिल्हा

संबंधित बातम्या

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आ.समाधान आवताडेंचा धडाका! मंगळवेढ्याला म्हैसाळचे, तर पंढरपूरला कॅनॉलद्वारे मिळणार पाणी; वीज पुरवठाही ८ तास होणार

July 10, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हट्टापायी पोटचा मुलगा गेला…; सांगोल्यातील ‘या’ घटनेने पालकांचे डोळे उघडले, नक्की वाचा काय घडलं?

July 8, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

मंगळवेढ्यातील १ लाख ९९ हजार मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! २००२ च्या यादीत नाव नसेल तर ‘या’ कागदपत्रांशिवाय पर्याय नाही

July 7, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

गुन्हेगारांनो सावधान! सुधारा, नाहीतर थेट कारवाई..; पोलिसांची सिंघम स्टाईल ॲक्शन; पोलीस अधीक्षकांनी गुंडांना बोलावून भर चौकात दिला सज्जड दम; लिहून घेतले हमीपत्र

July 7, 2026
Next Post
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 14, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळीच्या विळख्यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘हा’ मास्टरप्लॅन; नागरिकांना केली मोठी विनंती

July 14, 2026
शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा