टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडीकडून निघालेल्या कंटेनर भरधाव आणि दुचाकीच्या भीषण अपघातात सेवानिवृत्त पोस्टमास्तराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दि. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मंगळवेढा सांगोला महामार्गावरील सांगोला नाका येथील सर्व्हिस रोडवर घडली.

मिळालेल्या पोलिसांकडून माहितीनुसार, भारत केराप्पा मोहिते (वय ६१, रा. धर्मगाव रोड, मंगळवेढा) हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच १३ पी.पी. ८४४१ वरून जात असताना पाठीमागून कचरेवाडीकडून येणाऱ्या

कंटेनर क्रमांक केए ४० बी. ४७३४ ने अचानक जोराचा ब्रेक दाबला. त्यामुळे कंटेनरचा तोल जाऊन तो पलटी झाला. पलटी झालेल्या कंटेनरखाली दुचाकी सापडल्याने मोहिते गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत मोहिते यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. मयत भारत मोहिते हे सेवानिवृत्त पोस्टमास्तर असून ग्रामसेवक संघटनेचे सुरेश मोहिते यांचे बंधू आहेत.

विशेष म्हणजे, मोहिते यांच्या आईचे नुकतेच निधन झाले असून कालच त्यांच्या तेराव्याचा विधी पार पडला होता. अशा दुःखद प्रसंगानंतर लगेचच घडलेल्या या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी मोटार वाहन कायदा व संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
दरम्यान, सांगोला रोडवरून मंगळवेढा कडे येणाऱ्या सर्व्हिस रोडलगत एक रोड आहे तो बंद करावा अशी मागणी नागरीक करत आहेत त्या रोडमधून अचानक टिपर आदी वाहने येत असल्यामुळे अपघात होत असल्याची चर्चा सुरू आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











