टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा बसस्थानकाच्या गेटसमोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवेशद्वारात असलेले अतिक्रमण काढावे, अन्यथा १५ ऑगस्ट २०२४ रोजी विभाग नियंत्रक कार्यालय, सोलापूर
यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाचे शहराध्यक्ष आण्णा आसबे यांनी आगार व्यवस्थापकांना दिले आहे.
मंगळवेढा बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे दोन्हींपैकी एक प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले आहे. ज्या पंढरपूरच्या गाड्या जाणारे प्रवेशद्वार सुरू आहे,
त्या प्रवेशद्वारावर मध्यभागी एका व्यक्तीने १० *१२ चे लोखंडी दुकान कोणतीही परवानगी न घेता मांडले आहे. सदरच्या दुकानामुळे यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. तसेच वाहतुकीची कोंडीही होत आहे.
या व्यक्तीच्या अतिक्रमणाविरोधात कोणी बोलल्यास जातिवाचक शिवीगाळी केल्याची (अॅट्रॉसिटीची) केस करण्याची धमकी देत असल्याने कोणीही त्याच्या अतिक्रमणाविरुद्ध बोलत नाहीत.
एसटी महामंडळांतील काही अधिकारीही सदरच्या प्रवेशद्वारातील खोकेबहाद्दरला छुपा पाठिंबा देत आहेत. तरी तत्काळ सदरची नोंद घ्यावी व होणाऱ्या अपघातास आपण जबाबदार रहाल, हे गांभीर्यपूर्वक लक्षात घ्यावे, असे निवेदनात नमूद केले आहे. यावर आण्णा आसबे, डी. के. साखरे यांच्या सह्या आहेत.
एसटी प्रशासनाचा काही संबंध नाही
संबंधित अतिक्रमणाबाबत नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करून प्रत्यक्ष भेटून कारवाई करण्याबाबत सांगितले आहे; मात्र अद्याप त्यांच्याकडून अतिक्रमण केलेल्या व्यक्तीवर कारवाई झालेली नाही. यामध्ये एसटी प्रशासनाचा काही संबंध नाही.- संजय भोसले आगार व्यवस्थापक, मंगळवेढा
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज