मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
आता डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शनवर फक्त जेनेरिक औषधे लिहावी लागणार आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नव्या नियमावलीनुसार डॉक्टरांनी जेनेरिक औषधी न लिहून दिल्यास त्यांचा परवाना काही काळासाठी निलंबित केला जाईल.
आयोगाने म्हटले आहे की, देशातील लोक त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा आरोग्यावर खर्च करतात, ज्यामध्ये मोठी रक्कम फक्त औषधांवर खर्च केली जाते.
ब्रँडेड औषधांपेक्षा जेनेरिक औषधे ३० ते ८०% स्वस्त असतात. जेनेरिक औषधे लिहून दिल्यास खर्च कमी होईल.
२ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक आचारसंहितेनुसार डॉक्टरांनी ब्रँडेड जेनेरिक औषधे लिहून देणे देखील टाळावे. नोंदणीकृत डॉक्टरांनी जेनरिक नावाने औषध लिहून द्यावे, नियमांचे उल्लंघन झाल्यास डॉक्टरांना नियमांबद्दल सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला जाईल
किंवा व्यावसायिक शिक्षणासाठी प्र-शिक्षणास उपस्थित राहण्यास सांगितले जाऊ शकते. वारंवार उल्लंघन केल्यास परवाना काही काळासाठी निलंबित केला जाऊ शकतो.
राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने (आयएमसी) २००२ मध्ये जारी केलेल्या नियमावलीनुसार सध्याही डॉक्टरांना जेनरिक औषधे लिहून द्यावी लागतात. मात्र, त्यात दंडात्मक कारवाईचा उल्लेख नाही. त्यामुळे आयोगाने जारी केलेल्या नियमावतील ती तरतूद करण्यात आली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज