टीम मंगळवेढा टाईम्स।
डबघाईस आलेल्या सहकारी पतसंस्थांमध्ये हजारो लोकांचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत. त्यामुळे यापुढे सर्वच पतसंस्थांमधील १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी संरक्षित करण्यासाठी ‘स्थिरीकरण व तरलता साहाय्य निधी’ योजना सुरू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
या योजनेसाठी परतफेडीच्या अटीवर नियामक मंडळास १०० कोटी देण्यात येतील. राज्यातील २० हजार पतसंस्थांमधील ३ कोटी ठेवीदारांच्या ९० हजार कोटी ठेवी आहेत. त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे.
अंशदानाचा बोजा ग्राहकांवर नाही तर पतसंस्थांवर असेल
पतसंस्थांतील ठेवी संरक्षणासाठी सहकार कायद्यात कलम १४४- २५ अमध्ये स्थिरीकरण व तरलता साहाय्य निधी निर्माण करण्याची तरतूद आहे. त्यानुसार पतसंस्थांनी यात अंशदान जमा करावयाचे आहे.
प्रत्येक पतसंस्थेकडून दरवर्षी प्रति १०० रुपये ठेवीसाठी १० पैसे (१ लाखासाठी १०० रुपये) अंशदान रक्कम घेतली जाईल. अडचणीतील पतसंस्थेतील १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींसाठी यातून संरक्षण दिले जाईल.
अपंगत्व, मनस्वास्थ्य उपचारासाठी ज्येष्ठांना 3 हजार रुपये
दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न व ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजना राबवण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यात प्रामुख्याने अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकरण केले जाईल. त्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी केली जातील. आरोग्य विभागांमार्फत त्यांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग, तपासणी केली जाईल. पात्र लाभार्थीच्या बँक
खात्यात ३ हजार रुपये एकरकमी जमा केले जातील. तसेच मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येईल. या योजनेसाठी ४८० कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. राज्यात सध्या सव्वा ते दीड कोटी ज्येष्ठ आहेत. त्यापैकी अपंगत्व आणि मानसिक अस्वास्थ्याने पीडित १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा फायदा मिळेल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज