टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पाटकळ मार्गावर झालेल्या मोटर सायकलच्या अपघातामधील 40 वर्षीय मयताचे नातेवाईक अद्यापही मिळून न आल्याने पोलीस प्रशासनाने मंगळवेढा पोलीसांशी नातेवाईकांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेची हककीत अशी, दि.6 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता झालेल्या मोटर सायकल अपघातामध्ये 40 वर्षीय तरुण जखमी झाला होता.
या जखमी तरुणास प्रथमत: मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तद्नंतर अधिक उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र तो उपचारादरम्यान मयत झाला असून मयताच्या छातीच्या उजवे बाजूस इंद्रप्रस्थ असे गोंदवले आहे. चेहरा उभट,रंगाने गोरा, डोकीस काळे केस, नाक सरळ, चेहर्यावर दाढी,
मिशा बारीक अशा वर्णन असून नातेवाईकांनी तपासिक अंमलदार तथा पोलीस उपनिरीक्षक सौरभ शेटे मो. 9421954002 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज