टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यात माणसांवर कोरोनाचे संकट पुन्हा येऊ लागले असताना लम्पीने जनावरांवर तीन तालुक्यांमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे. अक्कलकोट, मोहोळ व मंगळवेढा हे तीन तालुके लम्पीचे नवे हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहेत.
जिल्ह्यात सध्या लम्पीचे ६७७ ॲक्टिव बाधित पशुधन आहे त्यापैकी निम्म्याहून अधिक अधिक ३८६ पशुधन हे या तीन तालुक्यामध्ये आहे.
लम्पीने सुरवातीच्या टप्प्यात माळशिरस, सांगोला व करमाळा या तीन तालुक्यांमध्ये धुमाकूळ घातला होता. आता या तालुक्यांमधील लम्पी आटोक्यात आला आहे.
जिल्ह्यात सध्या सर्वाधिक १५४ लम्पी बाधित पशुधन मोहोळ तालुक्यात आहे. त्या खालोखाल मंगळवेढा तालुक्यातील 140 तर अक्कलकोट तालुक्यात 92 लंपीबाधित पशुधन आहे.
जिल्ह्यात 39 हजार 570 पशुधनाला लंपीची लागण झाली होती, त्यापैकी 35 हजार 235 पशुधन सध्या लंपीमुक्त झाले आहेत.
लम्पीमुळे जिल्ह्यातील ३ हजार ६८५ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक १ हजार ३१२ मृत्यू माळशिरस तालुक्यात झाले आहेत.
अक्कलकोट तालुक्यात ६०, मोहोळ तालुक्यात २१७ तर मंगळवेढा तालुक्यातील २०१ जनावारांचा आतापर्यंत लम्पीमुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार १९१ मृत जनावारांच्या मालकांना जिल्हा प्रशासनाच्यातीने ७ कोटी ६० लाख सहा हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. अनुदान वाटपाचे ४५२ प्रस्ताव सध्या प्रलंबित आहेत.
या प्रस्तावांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जवळपास एक कोटी २० लाख रुपयांचे अनुदान वाटप केले जाणार आहे.
जिल्ह्यात शेतकरी आर्थिक अडचणीत अहे. आस्मानी अन् सुलतानी संकटांनी तो पिचला आहे. अशातच लम्पीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे तो अधिकच अडचणीत आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज