टीम मंगळवेढा टाईम्स।
देशातील ज्येष्ठ नागरिकांना महिना १० हजार रुपये सन्मान निधी मिळावा, या मागणीसाठी ज्येष्ठांची नावनोंदणी मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेत आतापर्यंत आठ हजार ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी झाली आहे.
देशातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा १० हजार रुपये सन्मान निधी जीवनगौरव अभियानांतर्गत मिळावा.
तसेच आरोग्यविषयक सुविधा मिळाव्यात याकरिता अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच व ज्येष्ठ भारतीय नागरिक संघाने केंद्र सरकारने प्रस्ताव दिला आहे.
मंचचे प्रमुख व रिझर्व्ह बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ अनिल बोकील व ज्येष्ठ भारतीय नागरिक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार देशमुख -दबडगावकर (लातूर) यांनी याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे.
या योजनेसाठी सोलापुरात धन्वंतरी शिक्षण व बहुउद्देशीय संस्था संचलित धन्वंतरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी व सचिव अशोक बिटला यांनी नावनोंदणी सुरू केली आहे.
आतापर्यंत आठ हजार सभासद नोंदणी झाली आहे. सोलापूर शहरात सुमारे एक लाख तर जिल्ह्यात पाच लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. या मोहिमेस राष्ट्रपतींनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सोलापूर येथे संपर्क साधावा.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी नावनोंदणीसाठी आहे. आधार कार्ड झेरॉक्स, मोबाईल नंबरसह शासकीय तंत्रनिकेतनसमोरील दिड्डी मेडिकल, गुर्रम हॉस्पिटलशेजारी, सोलापूर येथे संपर्क साधावा.
संपर्काची वेळ सकाळी १० ते २ व सायंकाळी ५ ते ६ अशी आहे. अधिक माहितीसाठी ९३२५४१००११ व ९२८४०४१७८५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संघाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी व सचिव अशोक बिटला यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज